Saturday, April 2, 2016

पडघम...
लेखक : संजय वैद्य.
समुह  :  काळ्या कपारी...
फेब्रुवारी २०१६


गाड्या वार्‍याशी स्पर्धा करत होत्या. गेले दोन दिवस गृप अत्यंत आनंदात भ्रमंती करत ज्याला एंजॉय करणं म्हणतात ते करत होता. सायन्स च्या पोस्ट ग्रॅज्युएशन च्या लास्ट ईयर चा हा थवा... हुषार, अभ्यासु, श्रीमंत, पण तितकाच निगर्वी.

(१)        राजेश जोशी,
जसे सगळे जोशी असतात तसाच, फक्त याला ओळख करुन घ्यायला वेळ लागायचा. पावणेसहा फुट उंची, गव्हाळ वर्ण, मजबूत बांधा. केस मात्र जरा वेगळ्याच वळणाचे, म्हणजे धड कुरळे नाहीत की धड सरळ नाहीत. मोजका आभ्यास करुन चांगले मार्क पटकावणारा, वडील बडे सरकारी अधिकारी, पण राहणीमान मात्र सर्वसामान्य.

(२)        निलेश अवचट,
अत्यंत साधा, मान खाली घालून पिरियड्स ला लिखाणकाम करणारा, चक्क पिरियडस करायचा म्हणून गृप मध्ये चर्चेत. कितिही किचकट मास्तर असो हा शांतपणे तासाला हजर..हा सहानुभूतीने सावळा म्हणावा अशा वर्णाचा, राजेस पेक्षा थोडासा उंच. केस व्यवस्थीत जेल वगैरे लावून मेंटेन केलेले. कुणीही लगेच दखल घ्यावी अशातला नाही.

(३)        अपुर्व रणदिवे
महा मिष्किल, पाच फुट दहा इंच उंच, गोरा, पण अंगकाठी भक्कम, पुरेशी दाढी येउनही मिशांच्या बाबतीत कुठे तरी खत कमी पडलं असावं..म्हणून सहसा हे महाशय सफाचट असायचे. अभ्यासात एकदम तल्लख. दिवसभर टवाळक्या करुन सुद्धा याचे सबमिशन्स वेळेत, टेस्ट्स मध्ये आणि अन्युअल्स ला घसघशीत मार्क्स असायचे. घरचा उत्तम, वडील कुठल्या तरी एम.एन.सी. मध्ये व्हि.पी.

(४)        जुई पवार,
एक नंबर खडूस. दिसायला छानच पण उंचीत मार खाल्लेली. कमी उंचीस न शोभणारा उभट चेहेरा. बहुदा कॉलेज मधले तरूण आपल्या साठीच इथे शिकायला आलेत असा सतत भाव हिच्या चेहेर्‍यावर असायचा. आभ्यास मार्क्स यात ठीक. सतत शंका घ्यायची खोड. अक्टिव्हा वर भरधाव रपेट करणं हा हीचा छंद. घरची परिस्थिती एकदम झकास. वडील, काका, आणि ४-५ चुलत भाऊ सगळे स्थानीक राजकारणात सक्रिय.

(५)        शुभांगी सबनीस
कॉलेज चं एक सततचं आकर्षण. साडेपाच फुटापेक्षा जास्त उंची, आकर्षक बांधा, गौरवर्ण, चेहेर्‍या प्रमाणेच ही टीपीकल इनोसंट वगैरे होती. इयत्ता पहिली पासून आजवर पहिल्या पाचात किंवा शेवटच्या दहात नंबर न पटकावलेली. घरची परिस्थिती एकदम हाय फाय.. वडील व्यवसाईक, दोन प्रेस शॉप्स बजाज, महिंद्रा महिंद्रा सारख्या दिग्गज कंपन्यांचे व्हेंडर, दिडशेच्या वर कामगार वागवणारे, दोन मोठे भाऊ, त्यातला एक सॉफ्टवेअर इंजीनीयर, मुकाम अमेरीका, आणी दुसरा वडीलांच्या बरोबर प्रॉडक्शन पाहणारा...

(६)         केतकी फडणीस

अगदि बिनधास्त मुलगी. संकोच, भीती यांच्यापासून लांब. हवा तेवढा आभ्यास करुन फस्ट क्लास कधीच न सोडणारी. राज्यस्तरावर हॉकी खेळणारी. जिवलग मैत्रिणिंना सोबत करणारी, आधार वाटणारी. ही मुळची कोल्हापुर ची.... तिच्या फॅमिली विषयी कुणालाच फारसं माहीत नव्हतं. स्फोटक स्वभाव लक्षात घेता कुणी विचारायचं धाडस सुद्धा केलेलं नव्हतं.  एका प्रसंगी, सिटी बस मधल्या एका टारगट मुलाला यथेच्च धोपटून... यानंतर सापडलास तर हॉकी स्टीक नी गुडघ्याच्या वाट्या फोडीन असा दिलेला दम कॉलेज विसरणं शक्यच नव्हतं. त्यामुळे, दिसायला चांगली असून सुद्धा तमाम प्रेमवीरांनी हिला केव्हाच बायकॉट केलेलं..

असे वेगवेगळ्या स्वभावाचे हे सहा जण केव्हा आणि कसे मित्र झाले हे कॉलेज चं आश्चर्य होतं. राजेश, निलेश आणी अपुर्व हे पर्टीक्युलरली, शुभांगी आणि केतकी शी बोलत असतात याचा कॉलेज मधल्या सगळ्याच मुलांना चोवीस तास हेवा वाटायचा.

असा हा गृप दिवाळीच्या सुट्टीत तीन मोटारसायकल्स वर जेव्हा भटकायला निघाला आणी दोन दिवस परीसर पिंजून काढत तिसर्‍या दिवशी परतीच्या मार्गाला लागला. कोणत्याच प्रसिद्ध जागेवर न जाता माहीती घेत नवनवीन ठीकाणं पहायची मस्त पैकी फोटो काढायचे, कसंही करुन रात्री मुक्कामी एखाद्या चांगल्या हॉटेल किंवा राजेश नाहीतर पुजा यांच्या ओळ्खीने डाक बंगल्यात मुक्काम करायचा असा कार्यक्रम चालु होता.

सहा च्या सहा जण तसे मॅच्युअर आणि घरच्यांचा विश्वास संपादन केलेले, दिवसभरात पाच सहा वेळा तरी आपापल्या घरी मोबाईल वर संपर्क ठेउन असलेले असल्या मुळे कुणालाच काळजी वगैरे वाटत नव्हती.

असंख्य फोटोंसह गृप परतला, आणी त्यांच्या या दौर्‍याचे फोटो ढिगानी फेसबूकावर अपलोड झाले. हास्य विनोद एकमेकांची फोटोवरुन टर उडवणं, कॉमेंट्स पास करणं याचा ओघ सुरु झाला. ऑफलाईन लाईफ मध्ये मोजकेच असले तरी यांचे ऑनलाईन फ्रेंड्स भरपुर होते. सहाव्या दिवशी अपुर्व च्य मेल बॉक्स मध्ये

“आजवर ठिक चाललं होतं... पण आजपासून सावध रहा, घराबाहेर जाणं टाळ आणि शुभांगी तसंच केतकी पासून लांब रहा”

एवढाच मेसेज आला.... मेसेज पाठवणारा “दिपक” नक्की कोण हे सुद्धा अपुर्व ला आठवेना... अनेक मित्र मैत्रीणींप्रमाणेच हा दिपक सुद्धा एक ऑनलाईन मित्र.. कधी काळी चॅट वर थोडा वेळ हवा पाण्याच्या गप्पा मारणं या पलीकडे या दिपक शी फारसा कधीच संबध आलेला नसल्या मुळे, अपुर्व नी सहाजीकच हा मेसेज निग्लेक्ट केला. नंतर मग आपल्या रुटीन मध्ये हे सगळं पार विसरुन अपुर्व कॉलेज मध्ये पोहोचला. पहीले तीन पिरियडस झाल्यावर अपुर्व बाहेर पडला, बाकीची मंडळी कुठे गायब झाली याचा विचार करत असतांनाच त्याला पाठमोरी केतकी दिसली..

भरभर तिच्या दिशेनी चालत असतांनाच काय कॅलक्युलेशन चुकलं कळलं नाही पण अपुर्व कशालातरी अडखळला, आणी मग तोल सावरत असतांनाच कॉरिडॉर मधल्या स्वच्छ कोट्यावरुन जणू स्केटींग करत केतकी पर्यंत पोहोचला. ब्रेक मारायचा जिवापाड प्रयत्न करुन सुद्धा हा केतकीवर थोडासा आदळलाच..

अर्थात व्हायचं तेच झालं... मागून कुणीतरी धक्का मारला असं कळताच केतकीची प्रतिक्रीया तिच्या व्यक्तीमत्वाला साजेशीच झाली. एका क्षणात अबाउट टर्न होत तिनं उजव्या हाताची एक सणसणीत थप्पड ठेउन दिली.. आधीच तोल गेलेल्या अपुर्व ला कल्पना नसतांना ही थप्पड बसताच तो काही कळायच्या आतच भुईसपाट झाला.

आपण कुणाला हाणलं हे कळताच मग केतकी ओशाळली आणी तिलाच पुढे व्हावं लागलं..
“सॉरी अपुर्व.. हे नकळत झालं.. आय अम रियली सॉरी...” असं म्हणत ती हात देत अपुर्व ला उठवायला लागली. बाकीचे स्टुडंट्स क्षणार्धात झालेल्या या प्रकारानी गोंधळलेले... झटका ओसरल्यावर मुलं पुढे झाली. सगळेच मग अपुर्व ला उचलायला धावले...

अर्थात त्याला उठता आलं नाही ते नाहीच. आत्तापर्यंत एक गंम्मत म्हणून पाह्णारे विद्यार्थी मग टरकले, रितसर प्राचार्यांना पाचारण झालं, अ‍ॅंब्युलंन्स आणावी लागून अपुर्व ला स्ट्रेचर वरुन हॉस्पीटल ला न्यावं लागलं. संबधीतांना फोन झाले, मोजके मित्र आणी घरची मंडळी हॉस्पीटल ला पोहोचली.

“पेशंट चे रिस्पॉंसिबल रिलेटीव्हस आहेत का इथे ? “ या वाक्यानी अपुर्व ची आई दचकली, ती पुढे येत असतांनाच “पेशंट्चे वडील किंवा मोठे भाऊ नाहीत का ईथे ? या प्रश्नानी वातावरण अजूनच गंभीर झालं. तेवढ्यात राजेश, जुई, निलेश आणी शुभांगी तेथे पोहोचले. केतकी चा भितीनी पांढराफटक पडलेला चेहेरा बघुन हे चौघंजण आणखीच हादरले, केतकी आणी या अवस्थेत ? हा प्रश्न बहुदा त्यांना सतावत असावा... जेमतेम मिनिटाभरात झालेला तो प्रकार केतकीनी यांना सांगीतला,

“हात्तीच्या एवढंच ना, मग एवढं घाबरायला काय झालं ? “ डोकं वगैरे थोडसं आपटलं असेल.. येईलच बघ तो काही मिनीटात... “ मित्रांच्या या वाक्यांनी केतकी बरीच सावरली..
“काय झालं अपुर्वला ? .. असं म्हणत त्याच्या वडीलांनी एंट्री घेतली आणि लगबगीनं ते डॉक्टरांच्या केबीन मध्ये प्रवेश करते झाले.

“ मि. रणदिवे,  लेट मी टेल यु समथिंग.. इती डॉक्टर...

“ हे पहा, पेशंट जणू बेशुद्धावस्थेत आहे, डावा जबडा थोडासा फाटलाय आणी एक दात सुद्धा तुटलाय”.. आम्ही प्रोसिजर्स सुरु केल्यात पण काही टेस्ट्स लगेच घ्याव्या लागतील....”
“ओके डॉक.. जे काही आवश्यक असेल ते करुयात.. “

ठिक आहे काउंटर ला पन्नास हजार पे करुन रिसीट घ्या आम्ही पुढच्या तयारीला लागतो...” हे वाक्य जरा अतिशयोक्तीपुर्ण वाटलं पण आता विचार करायला वेळ नसल्याने रणदिवे साहेब धावतच काउंटर ला पोहोचले. हाडाचा प्रोफेशनल आधिकारी तो... आवश्यक फोनाफोनी करत जस्ट पंधरा मिनिटात कॅशलेस बेनीफिट्स ची डॉक्युमेंट्स हजर करत त्यांनी पुढच्या कामांची लाईन लावली.

“मि. रणदिवे, मी इंस्पेक्टर लोणकर.. मला सांगा कुठे झाली ही मारामारी ?”
“मारामारी ?  काय बोलताय ? आहो तो कॉलेज मध्ये अचानक पडलाय.. मारामारी कसली ? तो काय टपोरी पोरगा आहे ? “

“हे पहा रणदिवे, अ‍ॅज अ पार्ट ऑफ माय ड्युटी, मला चौकशी करणं भाग आहे.. हॉस्पीटल नी एफ.आय. आर. दिलाय... पेशंट च्या इंज्युरीज पाहता तो नुसता पडला आहे असं मुळीच  वाटत नाही...
“सॉरी इंस्पेक्टर.. मला सुद्धा फार काही माहीत नाहीये.. जस्ट अर्धा तासापुर्वीच मी ऑफिस मधून इथे आलोय.. व्हाय डोंट यु आस्क धीस टू हिज फ्रेंडस ? “
“ह्म्म.. चला तुम्हीही सोबत रहा.. त्याच्या मित्र मैत्रिणींना नक्कीच ठाउक असेल “
“चला.... “
बाहेर मित्र होतेच.. अपुर्व च्या इंज्युरीज ऎकुन सगळे हादरले.. केतकीचा बांध आता मात्र सुटला.. काय झालं ते तिनं सांगीतलं चक्क रडतच... रणदिवेंनीच मग तिची समजूत घातली..यांची मैत्री प्रत्यकाच्या घरी चांगलीच माहीत होती.

“मला नाही पटत... आहो एका मुलीच्या थोबाडीत मारण्याने जबडा फाटतो का ? पडल्यावर डोकं आपटून बेशुद्धी येणं मी समजू शकतो... पण जबड्याला दोन स्टीचेस घालावे लागणार आहेत असं सर्जन म्हणतायत हे कसं विसरता ?” इंस्पेक्टरांची शंका अगदी जेन्युईन होती यात शंकाच नव्हती.

डोकं खाजवत सगळेजण मग ओ.टी. मधून काय फिडबॅक येतो याची वाट पहात बसले. सुमारे दोन तासांनी “ काळजीचं काही कारण नाही.. सगळ्या टेस्ट्स नॉर्मल आहेत.. जबड्याला स्टीचेस टाकलेत.. २-३ दिवसांत पेशंट ला डिस्चार्ज मीळू शकेल” या वाक्यानी उरला सुरला ताण संपला... रणदिवे मग ऑफिस ला निघुन गेले. त्यांची जागा त्यांच्या पत्नीनं घेतली. मोठी बहीण सुद्धा पोहोचली.. आणि मित्रमंडळी धावायल हजर होतीच.. तसं सगळ्य़ांचंच टेंशन कमी झालेलं फक्त केतकी सोडून... आपल्या एका फटक्यात एखाद्याचा जबडा फाटू शकतो हे तिच्या कल्पनेबाहेरचंच होतं.

ताण काळजी कमी  झाली म्हणता म्हणताच परत काळजीचे ढग दाटी करु लागले. याला कारण म्हणजे गेल्या सहा दिवसात अपुर्वमध्ये काहीच फरक पडत नव्हता...ओळखीचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक आस्थेनं त्याला पहायला येत होते, दोन दिवसांनंतर मध्येच त्याचा चेहेरा भीतिनं व्याकूळ व्हायचा आपली जागा बदलायचा तो आटोकाट प्रयत्न करत असावा, पण त्याला तसुभरदेखील हलचाल करता येत नव्हती.



 (अपुर्व)

कसल्या तरी आवाजानी झोप चाळवल्या सारखी झाली, थोडसं अनिच्छेनेच आजूबाजुला पाहीलं पण काहीच नव्हतं.  माय गॉड... डोळे उघडुन सुद्धा काहीच कसं दिसत नव्हतं ? पण दिसत नव्हतं हेच खरं. कानोसा घेत आजूबाजूला चाहुल घ्यायचा प्रयत्न करायला लागलो पण सर्वत्र भयाण शांतता होती.

ना आवाज ना दृष्टी....डोळ्यासमोर नाही पण डोक्यात ट्युब पेटली. पांघरुण झुगारत बेड वरुन उठत बाहेर पडलो... ऑं ??? तरीही आजूबाजूला सन्नाटा ? आणि अंधार ?? हात डोळ्यासमोर हालवत दिसतं का पाहू लागलो...आणि हादरलो...

मुळात मी होतो तिथेच होतो.. म्हणजे जागेवरुन हाललोच नव्हतो आणि सर्वत्र अंधारच होता. हे काहीतरी वेगळंच आहे, नॉर्मल नाही हे एव्हाना कळून चुकलं होतं.  शांतपणे विचार करत शेवटी खीशातुन मोबाईल काढून कुणाला तरी कॉल करायचा आणि जाणून घ्यायचं... हे एवढं सोपं काम आपल्याला आठवू नये याची लाज वाटली मला.

पण नाही........ प्रसंग सोपा नव्हता. खरं म्हणजे आपल्याला हात आहेत याची जाणीवच होत नव्हती. म्हणजे ????????????  डोळे नाहीत ? मघाशी उठता आलं नाही म्हणजे पाय नाहीत.. आणि........ फक्त कान शाबूत आहेत ??? पराकोटीच्या भीतीने नकळतच एक भीषण किंकाळी केव्हा निघाली हेच कळलं नाही.   आणि लगेच उरला सुरला धीर सुद्धा संपला.. कारण माझीच किंकाळी मला ऎकु आलेली नव्हती.

फक्त कुठेतरी वेदनेची एक लहर तोंडातून निघाल्याची जाणीव मात्र झाली. पण एक मात्र झालं वेदना होणं आणि मघाशी अस्पष्ट आवाज आले म्हणजे निदान आपण जिवंत आहोत हे समजलं.  याचाच अर्थ आपण शांतपणे विचार करु शकतो, परिस्थीतीचा आढावा घेउ शकतो ही जाणीवच परिस्थीतीतुन मार्ग काढायची किल्ली आहे हा विचार धीर देउन गेला.

काय विचार करावा या विचारात असतांनाच शरिराच्या कुठल्या तरी भागावर अस्पष्ट वेदना जाणवली आणी डोळे एकदम दिपले... पाचेक मिनिटं डोळे किलकीले करत हळूच उघडता, समोर पांढर्‍या ड्रेस मधली एक तरुणी दिसली. आपल्या व्यतीरिक्त या दुनियेत कुणीतरी आहे याची बर्‍याच वेळानी झालेली पहिली जाणीव.....

मग पुरता भानावर आलो... समोर स्वच्छ प्रकाश होता, आजूबाजुला कमालीची स्वच्छता, कसले तरी यंत्रांचे बीप बीप आवाज जंतुनाशकांचा एक विषिष्ठ वास... बहुदा मी हॉस्पीटल च्या रुम मध्ये होतो. मगाचे सगळे भास होते याचा आनंद माझ्या डोळ्यात दिसला असावा, ती तरुणी लगबगीनं रुम बाहेर गेली. मग लगेचच काही चेहेरे आत प्रवेश करते झाले. माझी आई, मोठी बहिण, कॉलेज चे काही मित्र मैत्रीणी असे ओळखीचे चेहेरे रुम मध्ये जमा झाले.

“मला जरा त्यांच्या डोळ्यात हलचाल जाणवली”  ती तरुणी... बहुदा नर्स किंवा शिकाऊ डॉक्टर असावी. एक अनोळखी प्रौढ चेहेरा माझ्या डोळ्यासमोर अवतीर्ण झाला आणि उजव्या डोळ्यावर ध्यानी मनी नसतांना प्रकाश पडला. वास्तवीक मला लगेच डोळे मिटायचे होते पण छे हलचालींवर बंदी असल्या सारखंच शरीर वागत होतं...

“नाही... डोळ्यात काही मूव्हमेंट्स नाहीत.. निदान या क्षणी तरी.. सिस्टर तुम्हाला भास झाला असावा... “ गेल्या तीन दिवसांत कसलीच मूव्हमेंट मार्क झालेली नाहीये.. पेशंट स्टील इन कोमा”

च्यायला मी आणी कोमात ? मघाशी या बयेनं इंजेक्शन खुपसलं असावं.. त्याच्या वेदना झाल्या, समोरचा प्रत्येक माणूस ओळखतोय, व्यवस्थीत विचार करतोय आणी म्हणे मी कोमात... हाड तुझ्या डॉक्टरच्या .......

“सिस्टर तासाभरात न्युरोलॉजिस्ट येतील... प्रिस्क्राईब्ड डोस वेळेवर द्या.. आणी प्लीज पेशंटचे रिलेटीव्हज... ईथे गर्दी करु नका.. लेट हिम रेस्ट”

डोंबलाची रेस्ट.. अरे काय झालंय काय मला ? असं ओरडून विचारायचं होतं पण... फक्त मनातच हे करु शकलो. पण मी स्वत:ला सावरलं गोष्टी रिकलेक्ट करायला लागलो..माझ्यासाठी हे खूप गरजेचं होतं. एवढ्यात रुमचा दरवाजा उघडला जाउन दोन अत्यंत जळजळीत डोळे आत आले. ती नजर पाहून माझी पाचावर धारण बसली. सुटके साठी धडपड करुन सुद्धा आपण हलु शकत नाही हे आता कळलंच होतं...

त्या नजरे बरोबरच आणखी काही सामान्य डोळे, जमा होऊन रुम माणसात आली. सगळे माझ्या बद्दलच बोलत होते. काहीतरी अघटीत घडलं होतं हे नक्की. मी का या हॉस्पीटल मध्ये आहे, हे आठवायचा प्रयत्न करत असतांनाच पुन्हा एकदा ती जहरी नजर माझ्यावर पडून पाठमोरी होत खोलीबाहेर गेली. कपड्यांवरुन ती शुभांगी आहे हे लक्षात येताच भीती बरोबर आणखी काही आठवायला लागलं.

मला आलेला इमेल... केतकी आणि शुभांगी पासून दुर रहा.....थोड्याच वेळा पुर्वी खोलीतले लोक मला नक्की काय झालं असावं यावर बोलत होते आणि त्यांच्यात शुभांगी सुद्धा होतीच. माझा धीर आता खचत चालला होता, त्या ईमेल विषयी जवळच्या लोकांना सांगायचं होतं. पण हलचाल, वाचा हे सगळं बंद असल्या मूळे हतबल झालेलो.  आपण वैतागुन चालणार नाही हे कळत होतं पण यातुन मार्ग कसा काढायचा हे समजतही नव्हतं.. नर्स नी दिलेल्या इंजेक्शन चा परीणाम म्हणून की काय झोप यायला लागली आणि डोळ्या समोरचा प्रकाश मंदावत गेला..

“मि. रणदिवे, काय गडबड आहे समजत नाही.. पण एकंदरीत केस अत्यंत बुचकळ्यात टाकणारी आहे. सिटी स्कॅन / एम आर आय एकदम नॉर्मल, बिट्स, एस.पी.ओ.टू काउंट आयडीयल, शुगर, युरिन डिस्चार्ज सुद्धा नॉर्मल फक्त मुव्हमेंट्स आणी आयसाईट डॅमेज आहे. एका लेडी डॉक्टर ला डोळ्यात हलचाली जाणवल्या पण प्रकाश टाकल्यावर बाहुल्या अकुंचन पावायला हव्या होत्या ते मात्र नाही झालं. नवख्या नर्स कडून इंजेक्शन घेतांना नॅचरली जी वेदनेची जाणीव पेशंट मध्ये दिसते ती सुद्धा नोटीफाय होत नाही. यामुळेच तो पुर्णपणे कोमात आहे असं म्हणावं लागतंय.”
आपण यापेक्षा सुसज्ज हॉस्पीटल मध्ये शिफ्ट करुयात का त्याला ?  मि. रणदिवेंच्या या वाक्याने मेडीकल टीम च्या चेहेर्‍यावर कुठे तरी नाराजीचा सूर दिसून आला.  तरीही...

“दॅट विल बी युवर डिसीजन मि.रणदिवे... या क्षणी सुद्धा आपण त्याला संपुर्ण अत्याधुनिक उपचारच देत आहोत. या उपचारांना पेशंट काहीच रिस्पॉन्स देत नाहीये हा प्रॉब्लेम वाटतोय.”
कोमा मध्ये असणं सोडलं तर कोणताच धोका पेशंट च्या बाबतीत नाहीये हे मी तुम्हाला अगदी खात्रीनं सांगू शकतो.”

“ह्म्म... उपचारात कोणतीच हयगय नसावी यासाठी मी तसं म्हणालो डॉक्टर... बाकी काही नाही. एक आठवडा झाला, नंतर तुम्ही हे का नाही केलंत अशा प्रसंगांना सामोरं जायचं नाहीये मला !! “

“रणदिवे, कोमाचा पेशंट आश्चर्यकारक रित्या अचानक नॉर्मल व्हायला लागू शकतो हे ऎकून तरी असालच. काही दिवसातच आम्ही तुम्हाला निर्धोकपणे डीस्चार्च देउ शकु... काही गोष्टी ऑबझर्व करायच्या आहेत तोवर मात्र हॉस्पीटलायझेशन कंटीन्यु करावच लागेल”  इथे डॉक्टरांचा सुर सुद्धा करारी होत गेल्याचं सगळ्यांनाच जाणवलं.



केतकी समोर दिसताच शुभांगीने तिला गाठलं आणि मग दोन मैत्रिणी झाल्या प्रकारा बद्दल बोलायला लागल्या. गेल्या पाच सहा दिवसांत शुभांगी निटसं झोपू शकलेली नव्हती, आणि केतकी तर अंगदुखी आणि टेंपरेचर यामुळे वैतागली होती.

“झोप येत नाही म्हणजे नक्की काय होतं गं ? “ एखादं रटाळ पुस्तक वाचायला घे म्हणजे लागेल झोप. “
“सगळं करुन झालं. दहा पंधरा मिनिटं डोळा लागतो आणि कशानी तरी जाग  येतेच..” .
कशाने जाग येते ? एक काम कर सकाळी लवकर जरा लवकरच उठ.. हवं तर अलार्म लाव.. दिवसा झोपु नकोस.. “
“ए बये हे सगळं केलंय... आणि अलार्म कशाला लागतोय ? इथे सलग झोप होतच नाहीये”

जे काय घडत आहे ते नेमकं भटकुन आल्यानंतरच होत आहे या क्षुल्लक गोष्टीकडे मात्र यांचं दुर्लक्ष होत आहे हे पाहुन मात्र कोणी तरी हर्षभरीत होत आहे हे कुणालाच कळत नव्हतं. इथुन पुढे आठवडाभर केतकी टेंपरेचर आणि अंगदुखी ने हैराणच राहीली. शुभांगी रात्र रात्र तळमळतच राहीली. या मुळे दोघींच्या तब्येतीवर अपेक्षीत विपरीत परीणाम होत गेला, चेहेरा ओढला गेला, डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसायला लागली. आता मात्र या दोघींच्या घरचे चिंतेत पडले. केतकीवर तर नेहमीच्या फिजिशियन ने वैद्यकशात्राप्रमाणे अचुक उपाय केलेले पण जराही आराम पडत नव्हता. काहीतरी अघटीत घडत होतं हे मात्र नक्की.  घरचे लोक तसे निर्धास्त असावेत कारण फार काळजी करण्या सारखं या दोघीच्या घरी तरी वाटत नव्हतं. पुढे काय मांडून ठेवले आहे हे माहीत नसतं हे किती छान असतं ना ? अज्ञानात सुख असतं म्हणतात तेच खरं... यामुळे निदान आपत्ती येई पर्यंतचं जिवन तरी सुखात जातं.
अपुर्व मात्र इकडे सावध झालेला होता. आपण कोमात नाही, आपल्याला सगळं ऎकु येत आहे, आपल्या संवेदना होतात, वेदना होतात, आपण सुसंगत विचार करु शकत आहोत आणि हे सुद्धा अगदीच कमी नाही हे अपुर्व ला समजून चुकलं होतं.

आपल्याला आलेला मेल कुण्या दिपक चा होता, आणि शुभांगी तसंच केतकी पासून धोका असल्याचंच त्याने सुचवलं होतं. शुभांगी बद्दल नाही पण केतकीची थोडीशी त्याला भिती वाटायला लागली होती. तिने इथे भेटायला सुद्धा येऊ नये असंही त्याला वाटायला लागलं.... का कोण जाणे मध्येच दिसणारे ते लालभडक उग्र डोळे केतकीचेच असावेत असंही त्याला वाटून गेलं.  अर्थात केतकी बाहेर गेल्यावर काही काळाने ते आपल्या रुम मध्ये का दिसावेत या प्रश्नाचं उत्तर त्याच्या अंगावर काटा आणत होतं.

हा विचार करत असतांनाच केतकीच्या आठवणीने त्याच्या शरीरातून भितीची एक तीव्र लहर पसरली...अपुर्व शहारला.... शेजारीच खुर्ची सरकल्याचा आवाज आला आणि एक पांढरा ड्रेस लगबगीनं बाहेर पडला. थोड्याच वेळात आता दरवाजा उघडला जाउन डॉक्टर मंडळी आत येणार आणि शरीरावर काही ठीकाणी भोकं पडणार या कल्पनेने अपुर्व वैतागला.  आणि झालंही तसंच... समोरचा स्वच्छ काचेचा दरवाजा ढकलत चारपाच डॉक्टर्स आत शिरले. आत येताच त्यांनी सगळे लाईट्स का घालवले हे मात्र अपुर्व ला समजलं नाही.


अंधार झाल्यावर मात्र अपुर्व अजुन सावध झाला. कारण अपेक्षेप्रमाणे इंजेकशन वगैरे टोचण्यात आलं नाही..पण हा अंधार वाजवी पेक्षा थंड होता, यात कुबटपणा ठासून भरलेला होता. खुप लांबून जरासा वारा येत असावा आणि त्या झुळुकीसोबतच हा कुबट वास येत असावा एवढा सुसंगत विचार अपुर्व नक्कीच करत होता.  आपली परिस्थीती अतिशय काळजी करण्या सारखी आहे हे तो समजून चुकला होता. जोवर परिस्थीतीचा आभ्यास करता येईल तोवर तो करायचा आणि यापलीकडे आपण सध्या तरी काहीच करु शकत नाही हे त्याने ओळखले होते.

खुप वेळाने मात्र लांबुनच कसले तरी आवाज येताहेत हे अपुर्व ला जाणवलं. आवाज मात्र कुणाच्या बोलण्याचे नसून बहुदा काही तालवाद्यं वाजत असावीत असंच काहीतरी वाटून गेलं अपुर्व ला.  ताल अगदीच वेगळा, थांबून थांबून येत होता, या नादामध्ये कमालीची उदासी भरलेली असावी. वातावरण अगदीच गढूळ आणि निराशेने भरलेले जाणवत होते. अंधार कोठडीत एखाद्या कैद्याला काय वाटत असेल ? याची जाणीव अपुर्व ला व्हायला लागलेली. प्रकाशाच्या एका तुकड्यासाठी सुद्धा एवढं तरसावं लागतं हे जाणवून आता मात्र त्याचा मेंदू थकायला सुरुवात झाली असावी. गेल्या काही दिवसात या अंधार्‍या जागेत आपण अनेकदा आलोत, हे आठवून याचा अंत काय ? आपल्याच इच्छे विरुद्ध आपण इथे का येतो ? हे प्रश्न आता बेचैन करु लागले होते ? कोण आहे याच्या मागे ? माझ्याच बाबतीत हा छळ का ? असं ओरडून विचारायचा एक तीव्र विचार आला आणि तसं अपुर्व ने केलं सुद्धा......... या वेळी मात्र त्याचाच संताप त्याला एकु आला. आपल्याच ओरडण्याने तो दचकला......... मिट्ट काळोखातच त्याने आजुबाजुला पाहीलं आणी भीतीने तो जोरात किंचाळला.. याला कारणच तसं होतं. आजुबाजुला अनेक जुनी माणसं उभी होती. त्याच्या कडेच पाहत..... त्यांच्या नजरेत कमालीचं समाधान होतं....

या बरोबरच एक करडा आवाज समोरच उमटला... ती भाषा कोणती होती हे जरी समजलं नसलं तरी .. साधारण “शांत रहा.......... जे केलं आहेस त्याचे परीणाम भोगावेच लागतील “ असंच तो आवाज म्हणाला असावा हे मात्र त्याला समजलं... कसं काय ? बहुदा कोणीतरी त्याचे विचार आणि बोलणं अपुर्वच्या मेंदू मध्येच पाठवत होतं....


“ओह नो... अगेन सिमिलर सिंप्टंप्स...”  सिस्टर आय यु शुअर की पेशंट मध्ये हलचाल दिसली ? “
“हो सर.... मी खात्रीनं सांगु शकते.. एकदम त्यांनी डोळे मिटले, काही वेळाने जणू ते जोरात ओरडले.. म्हणजे तशी एक्स्प्रेशन्स दिसली, डोळ्यात एकदम भितीचे भाव उमटले”
“ह्म्म्म.. पण आता पुन्हा पेशंट एकदम क्वाएट आहे” “ओके... ठीक आहे इलेक्ट्रॉनिक सर्व्हायव्हलंन्स मध्ये ठेवा...... मी लगेच एक पॉवरफुल सीसी कॅमेरा इंन्स्टॉल करायची व्यवस्था करतो”

लगेच या गोष्टीवर कार्यवाही झाली. आता मात्र अपुर्व ची प्रत्येक हलचाल रेकॉर्ड होणार होती. माहीत नाही यातून काय निष्पन्न होणार होतं पण राजेश, निलेश आणि जुई यांना आपलं म्हणणं डॉक्टरांना पटलं याचंच समाधान वाटत होतं.  या तिघांनाही नर्सेस च्या बोलण्यातच तथ्य वाटत होतं. यामागे कदाचित आपला जिवलग मित्र बराच होतो आहे ही भाबडी कल्पना सुद्धा असणार होती.  पॉझीटीव्ह थिंकिंग म्हणतात तसा प्रकार.

केतकी चे वडील म्हणे तिला कोल्हापुर ला घेऊन गेलेले... आणि शुभांगी घराबाहेर पडतच नव्हती. दोघींचे सेल स्विच ऑफ.. काहीच कळायला जागा नव्हती. तरीही धीर करत हे तिघे शुभांगी च्या घरी पोहोचले.  जराशा अनिच्छेनेच शुभांगी च्या आईने त्यांना घरात घेतलं. शुभांगीला खरोखर बरं नसावं.  १०-१५ मिनिटांनी तिची आई तिला घेऊनच आली, आणि या तिघांना पाहुन शुभांगी सुद्धा बरीच ताजी तवानी झाली.

शुभांगी एकच त्रासाने त्रस्त होती आणि ती म्हणजे निद्रानाश ! तिला सुद्धा एका पेक्षा एक ख्यातनाम डॉक्टरांचे उपाय सुरु होते, सगळ्या टेस्ट्स अगदी नॉर्मल, बाकी काहीच नाही फक्त सततच्या जागरणामुळे तब्येत बिघडलेली.  कुठे तरी तिच्यातला टवटवीतपणा हरवायला लागला आहे हे या तिघांच्याही लक्षात आलं.  थोड्या वेळाने तिची आई थोडीशी रागातच यांच्या संवादात सामील झाली.

“तुम्ही तरूण पोरं कुठेही भटकता, वेळ पाहत नाही, जागा पाहत नाही, दिवस पाहत नाही.... पहावं तेव्हा भटकत असता  हे त्याचेच परिणाम आहेत.”
“आहो आई पण आम्ही अशा कोणत्याच धोकेदायक जागी भटकलेलो नाही... आणि तसं असतंच तर आम्ही कसे ठीक ठाक आहोत ? “
“पण ते दोघं ? तो अपुर्व गेले १५-२० दिवस आय सी यु मध्ये आहे आणि ती केतकी ? तिचा ताप कधीच उतरला नाही......... तीचे वडील तिला शेवटी कोल्हापुर ला घेऊन गेले म्ह्णे..”
“ते खरं आहे आई पण... ताप अंगदुखी हे कुणाला होत नाही ? कदाचित औषधं लागू पडली नसतील..”
“तेच म्हणतेय ना मी ? अपुर्व ला औषधं लागु पडत नाहीत, केतकी ला लागु पडत नाहीत आणि शुभांगीला सुद्धा !! हे एकाच वेळी कसं शक्य आहे  ? आपल्या गावातले सगळेच डॉक्टर डॉक्टरी विसरलेत ??? “

“तुम्ही पोरं काहीही म्हणा, हे सगळं तुम्ही भटकुन आल्यावरच घडत आहे” हिच्या वडलांना सांगावं तर पटत नाही...... हिचा भाऊ म्हणतो इतर दोघांच्या अवस्था पाहून हिने टेशन घेतलंय”
“आई......... मला कसलंच टेंशन नाही हे किती वेळा सांगु ? “ त्या दिवशी अपुर्व घसरला आणि केतकीला धक्का लागला... नकळत तिने एक थोबाडीत मारली बस..... “ यात मी कुठे येते ? मला कसलं टेंशन ?

संभाषण असल्याच वाद विवादात फिरणार हे या त्रिकुटाने ओळखलं. सबनीस काकींचा निरोप घेउन हे फ्रेश व्हायला एका अमृततुल्य मध्ये शिरले आणी मग मात्र गप्पांचं तसंच चर्चेचं पेव फुटलं. संपुर्ण ट्रीप परत एकदा स्कॅनच झाली म्हणा ना  पण त्यात विषेश असं काही आठवलं नाही हे सुद्धा तेवढंच खरं. फक्त ट्रीप नंतरच हे घडतंय यावर एकवाक्यता झाली.

"तुम्ही दोघं मला उद्या परत भेटा .. कॉल करा आधी .. काहीतरी करु या ! “
“आपण काय करणार जुई ? “ हे शब्द नाही आले पण दोघांचे प्रश्नार्थक चेहेरे जुईने चाणाक्षपणे ओळखले. “सांगीतलं ना करु काही तरी म्हणून  ! आहेत काही आयडीया...... उद्याच बोलेन यावर.. आधी मला माझ्या बाबा आणि दादाशी बोलु द्या.........”

ओके... दोघांच्या बोलण्यात आणि चेहेर्‍यावर आता मात्र उत्साह दिसत होता. आपणही काही करु शकतो.. आपल्या मित्र मैत्रिणीला मदत करु शकतो ही जाणीवच खुप सुखद होती. आता काय करणार हे माहीत नसून सुद्धा एक जेन्युईन समाधान झळकत होतं हे मात्र खरं. उरलेला दिवस मात्र तिघेही आपापल्या विश्वात राहीले. आठवण आली ती संध्याकाळी.... क्रमा क्रमाने तिघेही हॉस्पीटल ला अपुर्व ला भेटून म्हणजे पाहुन आले. परिस्थीतीत काहीच बदल नव्हता फक्त अपुर्व दिवसेंदिवस खंगत चाललाय हे लक्षात येत होतं. आज शुभांगी प्रमाणेच आपल्याला सुद्धा निद्रादेवीची आराधना करावी लागणार हे दोघांनाही समजुन चुकलं ... जूई ने सस्पेंन्सच तसा निर्माण केलेला...काहीतरी करु म्हणजे नक्की काय विचार करतेय ही ?  या घोंगावणार्‍या प्रश्नावर विचार करत करतच केव्हा तरी झोप लागली.


गार अंधारातही झोप लागली की काय ? असा विचार करतच अपुर्व जागा झाला, डोकं ठणकत
होतं अजुनही डोक्यात ती अगम्य भाषा, ते नगार्‍याचे उदास/गंभीर आवाज घुमत होते. आता
मात्र डोळे उघडल्यावर स्वच्छ प्रकाशामुळे दिपले. आजुबाजुला काही आवाज झाले, आणि
नेहमी प्रमाणेच समोरचा दरवाजा उघडला गेला आणी प्रसन्न चेहेर्‍याने दोन डॉक्टर्स आत
प्रवेश करते झाले.

येस मी रणदिवे... देअर आर इंप्रुव्हमेंट्स पेशंट मध्ये हलचाल जाणवते आहे.
डोळ्यात सेंन्सेशन आलेलं आहे, कशा मुळे तरी डोळ्यांच्या बाहुल्या हललेल्या स्पष्ट
दिसल्यात. “  डॉक्टरांचा उत्साह ओसंडून
वाहत असावा. सी सी टिव्ही फुटेज सुद्धा आम्ही पाहीलंय... गेले अनेक तास जणू
झोपेतही पेशंटच्या चेहेर्‍यावर अनेक भाव दिसलेले आपण फुटेज मध्ये क्लियर पाहु
शकाल.

अपुर्व लक्षपुर्वक हे सगळं ऎकत होता. बोलता येत नाही तोवर तरी आपण हावभावावरुन
इतरांना सुचवु शकतो हे समजून त्याला प्रचंड आनंद झाला. अर्थात अंधारी जागा, नगार्‍यांचे
आवाज, अगम्य भाषा हे कसं सुचवायचं हे मात्र त्याला एक कोडंच वाटत होतं. तरी सुद्धा
अगदिच काही नसल्या पेक्षा काहीतरी दुवा आहे याचं समाधान त्याच्या चेहेर्‍यावर
दिसलं असावं.

काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय तो ”....  अपुर्व बोल ना रे...... आईचा आवाज ऎकुन माणसात
आलेल्या अपुर्व च्या तोंडून अभावितपणेच अस्पष्टसा हुंदका फुटला. बाकिच्यांना तो
ऎकु आला की नाही समजलं नाही पण सभोवताली.. वातावरण नक्कीच समाधानकारक असावं.
आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे ते काय आणि कसं हे मात्र या क्षणी माहीत
नव्हतं.

जसं आपण त्या अंधार्‍या निद्रेत काही ऎकु शकतो, भोगू शकतो तसं काही आणू शकलो
तर ? या स्टेज मध्ये आपण हलु शकतो का ? उठु शकतो का ? याचा विचार करत असतांनाच
आजुबाजुला अंधार व्हायला सुरुवात झाली.

अंधारकोठडीत गेल्यावर काय काय होतं हे एव्हाना अपुर्वला माहीत झालेलं. पण आता
त्याचेही इरादे पक्केच होते. आपल्या मनाविरुद्ध आपण इथे येतो पण आजवर फिजिकली
कोणतीही ईजा झालेली नाही, आपल्याला ठार मारणं हाच उद्देश असता तर आजवर आपलं तेरावं
सुद्धा आटोपलं असतं हे सुद्धा अपुर्व च्या लक्षात आलेलं.  इजा म्हटल्यावर काहीतरी हलचाल आवश्यक होती. आणी
काय आश्चर्य अपुर्व चक्क उठुन उभा राहु शकला. अनेक दिवसांनंतर ऊभा राहिल्याने
दुसर्‍याच क्षणी तो चक्कर येऊन पडला. डोकं कशावर तरी आपटलं, वेदना जाणवत असतांना
सुद्धा त्याला आनंदच झाला.

त्या आवाजाने आजु बाजुला काही अदृष्य हलचाली झाल्यात. एक अतिशय वाईट किळसवाणा
असा हिरवट अंधूक प्रकाश सभोवताली जाणवला. नुसत्या त्या दृष्यानेच अपुर्व लटलट
कापायला लागला, अगदीच अनपेक्षीत असं दृष्य पहावं लागल्या मुळे चित्कारल्या सारखा
आवाज त्याच्या तोंडून निघाला.

थोड्याच वेळात ते नगार्‍याचे आवाज कानावर यायला लागले आणी आज मात्र त्यांचा
ताल वेगळा आहे, हे अपुर्व च्या ध्यानात आले. किती वेळ गेला कोण जाणे पण काही
काळजीचे सुर / शब्द कानी यायल लागले. ही काळजी त्याला ईजा झाली म्हणून होते की
त्याला हलचाल करता आली म्हणून आपापसात काळजी वाटल्याने ? हे मात्र समजत नव्हतं.
आवाजांची तीव्रता कमालीची वाढत गेली ते जवळ जवळ यायला लागले. एक क्षण असा आला की
बहुदा कुणाचा तरी स्पर्श जाणवेल असं वाटलं पण तसं काही न होता हिरवट उजेड कमी कमी
व्हायला लागला. अचानक डोळ्यांसमोर प्रखर प्रकाश जाणवून डोक्यातून तिव्र वेदना उठली
आणी अपुर्व मग बेंबीच्या देठा पासून ओरडला......

जुईचा कॉल अत्य़ंत अधीरतेने राजेश ने रिसीव्ह केला.  नकळत आपलेही हार्टबीट्स वाढलेत हे त्याला
लक्षात आलं.
या तुम्ही दोघं माझ्या कडे इथे आल्यावरच बोलु”  एवढं बोलुन कॉल कट......... या बयेला असं काय
समजलं आहे ? या विचाराने राजेश अस्वस्थ !! तेवढ्यात पुन्हा सेल खणखणला आणि राजेश
कमालीचा दचकला..
हॅलो...
निलेश ला घेउन ये सोबत ... त्याचा सेल बंद आहे बहुतेक लागत नाहीये”  यावर राजेश काही बोलायच्या आतच फोन परत
कट......

निलेश च्या घरी राजेश पोहोचला तेव्हा आपल्यावरच प्रश्नांची प्रचंड सरबत्ती
होणार आहे हे माहीत नसल्या मुळे चक्क रडकुंडीस आला. तेच ते प्रश्न आणि द्यायला
समाधानकारक उत्तरं नाहीत... वैतागला तो... त्यातून निलेश च्या घरी म्हणजे अगदि
अशक्य वातावरण होतं. थोडक्यात तुम्ही कार्टी आता आणखी काय दिवे लावणार ? आता
कुठेही जाउ नका वगैरे वगैरे.....

नशीबाने तेवढ्यात जुईचा फोन आला, ती तीचे वडील आणि मोठा भाऊ यात आहेत
समजल्यावर दिड दोन तास गड लढवल्यावर मंडळी जुईच्या घराच्या दिशेने कुच झाली. ती
वाटच बघत होती. झाल्या प्रकारावर तीचं तिच्या मोठ्या भावाशी आणि वडीलांशी बोलणं
झालेलं. नुसतेच वैद्यकीय उपचार कामाचे नसावेत असंच त्यांचं म्हणणं पडत होतं.

राजकीय क्षेत्रातले असल्या मुळे प्रत्येक गोष्ट निट सगळ्या बाजूने पारखुन
घेतल्या शिवाय काहीच न करणारे हे पवार कुटूंबीय या प्रसंगात सगळ्यात महत्वाचा रोल
निभावणारेत हे या दोघांच्या लक्षात आलं. आज ते एका ठीकाणी जाणार होते ते म्हणजे
राजेश निलेश आणी जुई.  जीथे जाणार त्यांना
फोन वर शक्य तेवढी कल्पना दिल्याचं जुईने सांगीतल्यावर या दोघांना बरंच रिलॅक्स
वाटायला लागलं.

पवारांच्या अलिशान गाडीतुन हे चौघे एका घरा जवळ थांबले आणि चौघांनाही नवल वाटलं.  जुईचा दादा कदाचित एखाद्या साधु किंवा मांत्रिकाकडे घेऊन जात असेल असं मनात असलेले हे चौघंजण एक चांगल्या पण छोट्याश्या बंगल्याकडे पाहुन थोडेसे विस्मयात पडले. कॉल बेल चं पांढरंस्वच्छ बटण दाबताच आत कसला तरी आवाज झाला आणी काही सेकंदातच एका ५०-५५ वर्षांच्या व्यक्तीने दरवाजा उघडुन प्रसन्न चेहेर्‍याने यांचं स्वागत केलं.

“या” एका शब्दात आवाजातला आत्मविश्वास या सगळ्यांनाच जाणवुन देत त्यांनी बसायची खुण केली आणि ते आत निघुन गेले.

त्या दिडेक मिनिटात या पाचही जणांनी आलटुन पालटुन एकमेकांची फक्त तोंडं पाहिली त्या  प्रसन्न पण गुढ वातावरणात बोअर व्हायची सुरुवात होण्याच्या क्षणीच ते गृहस्थ हॉल मध्ये प्रवेश करते झाले आणि

“ह्म्म.... तात्यासाहेबांनी मला तसं सविस्तर सांगीतलं आहे, पण एकदा तुम्ही पोरांनी पुन्हा सांगावं”  असं म्हणत शांततेचा भंग केला.  एक होतं पण.... याच्या चेहेर्‍यावर कसलेही टेंशन दिसते नव्हते, ना भिती, ना वाजवी पेक्षा जास्त उत्सुकता.

पुन्हा एकदा प्रवासवर्णन ते कॉलेज मधला तो प्रकार हे या तिघांनी शक्यतो संगतवार कथन केला.

“अच्छा त्या भागातून फिरलात तर.... ठिक आहे..... थोडीशी कल्पना आलीये... त्या आधी आपण जरा हॉस्पीटल ला जाउन येऊया “  असं म्हणत ते दाराच्या दिशेने निघालेले पाहुन  चौघं भांबावुन उठले आणि ति व्यक्ती स्फोट झाल्यागत हसली.  बसा बसा... कॉफी येतेय मग पुढील चर्चा करु...

“दादा हे नक्की कोण आहेत ?  इति जुई.. तिच्या भावाला...
“ए मी पण नाय ओळखत यांना पण तात्यांनी पत्ता आणि डिटेल्स दिलेत... ते “महंत” आहेत असं म्हणाले तात्या....

“महंत ? दारावर तर बहुतेक चिपळुणकर अशी काहीशी पाटी पाहीली...??? “
“जाउ दे ना महंत म्हणून ओळखत असावेत यांना”  अत्यंत खासगी आवाजात यांचं बोलणं चाललेलं असतांनाच,
“अरे मी चिपळुणकरच !!  “ असा स्पष्ट आवाज जवळच उमटला आणि हे चक्क दचकले देखील. जुईने मग त्यांच्या हातातील कॉफीचा ट्रे घेतला आणि प्रत्येकाला मग्स सर्व्ह केले.

तुम्ही शक्यतो सारं काही न विसरता सांगीतलंय नाही का ? “ असं महंत म्हणत असतांनाच सगळे उठले होते. तिघांनी पुन्हा सगळं आठवतच मग महंतांचं घर सोडलं...हॉस्पीटल ला पोहोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजुन गेलेले होते.

या तुम्हीही माझ्याबरोबर आत या.. या महंतांच्या बोलण्याचं बरं वाटतच ते आय सी यु मध्ये शिरले.. महंत काय करणार ही उत्सुकता होतीच ना ?


अक्षरश: असह्य प्रकाश वाटत होता अपुर्व ला. डोळे दिपले अगदी तिव्र कळ देखील आली डोळ्यांमध्ये, आपण ओरडलो हे आठवलं आणि काही क्षण गेल्यावर आपण हॉस्पीटल मध्ये असल्याचं लक्षात आलं. एक अनोळखी चेहेरा पाहुन वास्तवीक दचकायला हवं होतं पण का कुणास ठाऊक त्या चेहेर्‍यावर दिसणारे विलक्षण तेज कुठे तरी अपुर्व ला आशेचा किरण दाखवुन गेले. अपुर्व ची ती गडबड, अस्पष्ट लगबग बहुदा त्या चेहेर्‍याने टीपली असावी, त्या चेहेर्‍यावर एक मंद स्मीत आल्या सारखे अपुर्व ला जाणवले.

दरवाजा ढकलत दोन डॉक्टर्स दोन नर्स आत आल्या, पुन्हा अंगाला काही छिद्र पडणार या कल्पनेने अपुर्व वैतागला आणि “मला काहीही झालेले नाही असे म्हणत ताडकन उठला....

अर्थात या वेळी त्याचा हात फक्त उचलला जाऊन काहीतरी नकारार्थी हलचाल, हाताने समोरच्याला थांबवायचा प्रयत्न झाला. लगबगीने पुढे येणार्‍या नर्सेस ला थांबवत महंतांनी एक क्षण तो हात हातात घेतला आणि दुसर्‍याच क्षणी सोडुन दिला.  काय झालं कुणास ठाऊक पण महंतांच्या त्या एका स्पर्शातच अपुर्व पुन्हा गाढ झोपी गेला.

“डॉक्टर ... तुमची काळजी सुरु असु द्या..पण सांगतो त्याला या औषधांची फारशी गरज नाही. रिपोर्ट्स नक्कीच नॉर्मल असणार. “ तुमचा पेशंट जरा वेगळ्या जगात आहे, जेवण बंद असल्या मुळे जे इंजेक्टेबल्स लागतील तेच द्या प्लीज... ही इस नॉर्मल”  फक्त एक को ऑपरेट करा, ही पुडी सतत त्याच्या उशी खाली असु द्या.

महंतांना बहुदा ओळखत असावेत त्यांच्या या सुचनेवर कोणीच आक्षेप घेतला नाही हे देखील खरे. विषय ओळखीचा होता की महंतांच्या त्या करड्या नजरेचा समजलं नाही...पण या सगळ्यांनाच ती पुडी तेथे ठेवल्यावर उगाचच रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं.

“चला माझ्या घरीच जाऊ... “  महंतांचे शब्द म्हणजे उर्मटपणा वगळून केलेली आज्ञाच जणु... मंडळी पुन्हा महंतांच्या घरी जायला निघाली. त्यांच्या घरी पोहोचल्यावर मात्र थोडंसं वेगळंच घडायला सुरुवात झाली.. महंत घरात  आल्या आल्या लगेच आत निघुन गेले. चौघंजण एकदम ब्लॅंक... महंत परत  येई पर्यंत हे कोरा चेहेरा करुन शांत बसलेले. हॉल मध्ये पिन ड्रॉप सायलेंन्स...
==

तब्बल आठ दहा मिनिटांनी ही शांतता भंग झाली.  महंत बहुदा फ्रेश होऊन आले असावेत.  कपडे बदललेले शुभ्र पांढरा शर्ट आणि तेवढाच स्वच्छ पांढरा पायजमा, फरक एकच तो म्हणजे कपाळावर गंध आणि कंठावर एक भस्माचा पट्टा. 

एवढ्या  बदलातच त्यांचं पुर्ण व्यक्तीमत्व आणखी उजळून निघालंय असंच वाटलं सगळ्यांना. 

वास्तवीक अगदी सर्वसामान्यांप्रमाणेच महंतांचं घर होतं.  डेकोरेटिव्ह गोष्टींची रेलचेल मुळीच नसलेला तो हॉल, साधेच पण लगेच उठुन दिसणारे पडदे, फर्निचर मात्र अस्सल सागवानी आणि शिसवी लाकडाचं होतं.  त्याला अगदी कमर्शियली फ्रेंच पॉलिश केलेलं. थोडक्यात फार वेगळं असं काही नव्हतंच.. तरी सुद्धा वातावरण जरा वेगळंच जाणवत होतं.

महंत काही बोलणार एवढ्यात "चहा" आला.  या चौघांना अक्षरश: महंतांना धन्यवाद द्यावेसे वाटले. गेल्या काही तासातील धावपळीत साधं पाणी प्यायला सुद्धा झालेलं नव्हत.  चहा पाहताच यांचे बदललेले चेहेरे महंतांनी ओळखले असावेत.. ते मंदपणे हसले. 

" तुम्हालाच नव्हे मला सुद्धा चहाची नितांत आवश्यकता होती "   आता मात्र सगळेच मोकळेपाने हसले. 

" घ्या " असं म्हणत महंतांनी चहाचा कप बशीसह उचलला. आणि चक्क मस्त पैकी फुंकर मारत घुटके घ्यायला सुरुवात केली सुद्धा... त्यांच्या या वागण्यामुळे नक्कीच वातावरणातला ताण कमी होत होता.  पोरं नॉर्मल होत त्यांचं बिचकणं कमी होतंय हे महंत टीपत होते.  वातावरणातला दबाव कमी झाल्यावरच पोरं जास्त अचुक सांगतील असा त्यांचा होरा असावा. 

चहाच्या रिकाम्या कपांना ट्रे मध्ये ठेवुन जेव्हा महंत स्वत: ते घेऊन जायला लागले तेव्हा अभावितपणे जुई उठली.. पण महंतांनी तिला खुणेनंच बसायला सांगीतलं आणि ते आत गेले सुद्धा.  पोरं एकमेकांकडे पाहताहेत तेवढ्यात एक शब्दांत सांगता न येणारा उग्र वास.. सुगंधच पण ज्याचं वर्णन करता येणार नाही असा... अचानक हॉल मध्ये दरवळायला लागला. काहीतरी क्लीक झाल्या प्रमाणे तिघंजण पाहता पाहता जणु ट्रान्स मध्ये जाउ लागले, ट्रीप, ते हास्यविनोद, मस्त पैकी धांगडधींगा, बाहेर यथेच्च खाणं, फिरणं झर्रकन डोळ्यासमोरुन गेल्या सारखं त्यांना जाणवलं.  


पहीला दिवस मस्त पैकी धांगडधींगा करण्यात थोड्याश्या कड्या कपार्‍या पालथ्या घालण्यात गेला. रात्र अशाच एका डाक बंगल्यावर काढुन मंडळी आता पुढच्या भटकंतीला निघाली.   समवयस्क चांगले मित्र मैत्रिणी एकत्र आल्यावर आनंद जसा ओसंडुन वाहत असतो तसाच यांचाही वाहत होता.  फिरत फिरत मंडळी हमरस्त्यावर एका टपरीवजा स्टॉल वर वडा पाव आणि चहा ढोसायला थांबले.   पोरं धनिक असली तरी वडापाव वगैरे फार पॉश हॉटेल मध्ये खायचा पदार्थ हे लोक्स समजत नव्हते.  सकाळच्या सुमारास गरमा गरम वडा सोबत मऊसुत लादी पाव, तळलेली मिरची आणि लसणाची झणझणीत चटणी... आणखी काय हवं ?

हादडणे प्रकरण सुरु होतं. एवढ्यात काही जण एका एस यु व्ही तुन  उतरले. बहुदा ते सुद्धा असेच भटकायला आलेले असावेत.  स्टॉल वर आता अचानक गर्दी झालेली.  कढईत यथेच्च वडे तळायला टाकुन वडेवाला केव्हा एकदा होतायत याची वाट बघत होता.  दोन्ही गृप्स च्या आपापसात  गप्पा एकमेकांची टींगल करणे वगैरे चालु होतेच.  बोलण्या बोलण्यात एकमेकांची ओळख होऊन काल ते कुठे जाउन आले आज कुठे भटकणार वगैरे गोष्टी एक्स्चेंजही झाल्या.

निलेश जास्त चौकस. त्या गृपच्या बोलण्यात बाजुलाच एका भागात एक खुप मोठा पडका वाडा आहे, मोठ्ठी विहिर आहे एकुणच एक मिस्टेरियस प्लेस असुन त्या परिसरात तो भाग एकदम दुर्लक्षीत असल्याचं यांनी ग्रास्प केलं.  आता आपणही तिथे भटकुन यावं असा विचार व्यक्त होताच

“ काय येडं आहे .. अरे पडके वाडे पाहुन काय करणार ?”
“  जगावेगळी आवड च्यायला ह्याची.”

वगैरे वगैरे फाटे फुटले.. पण शेवटी थोडं भटकुन यायला काय हरकत आहे ? या विचारने गृप पोटपुजा झाल्यावर तिकडे जायला निघाला.  फार काही पाहण्या सारखं नाहीये पण तो दगडी वाडा खुपच मोठा आहे, फार पडझड झालेला नाही,  आजुबाजुला अगदीच शुकशुकाट आहे, पण विहिरीला भरपुर पाणी आहे, आणि पिण्यालायक अगदी गोड असं आहे एवढी माहीती आता या गृप च्या डोक्यात होती.  रस्ता वगैरे विचारुन मंडळी निघाली.  पेट्रोल टॅंक्स ऑलरेडी फुल होते आणी मुळात फार लांब जायचे नसल्या मुळे एवढ्यात पंपावर जायची गरज नव्हती.  सोबत च्या सॅक्स मध्ये मात्र थोडेसे खाण्याचे जिन्नस ठेवायची दक्षता यांनी घेतली होती.

अनायसे ज्यांनी सोबत असायला हवं ते सगळेच बरोबर आहेत म्हणून भटकंतीमध्ये इतर मित्राच्या रिकाम्या चौकशांचे फोन नको म्हणून सेलफोन्स बाय डिफॉल्ट सायलेंट वर !! आत शिरल्यावरही रेंज असेल नसेल माहीत नव्हतं  भटकंती आटोपुन रात्री उशीरा घरी पोहोचतो एवढे मेसेज प्रोअक्टीव्हली यांनी घरी टाकलेले होतेच, सो आता फक्त फिरायचं होतं... भटकायचं होतं.... आणी तो दगडी वाडा न्याहाळायचा होता.

साधारण २५-२६ किलोमिटर आत गेल्यावरच त्या भागाची निर्मनुष्यता सगळ्यांनाच जाणवु लागली.  त्यावर विचार करण्या आधीच वाळक्या झाडा झुडुपांमागे तो वाडा दिसला.  काळ्याकुट्ट दगडांचा तो भक्कम वाडा किमान १००-१२५ वर्षांपुर्वीचा तरी असावा.  वाडा कसला एक छोटासा किल्लाच म्हणा. आजुबाजुला वाळकं तण वाढलेलं, दगडी भिंतींअर आलेले वेल / काही जंगली झुडुपं वाळल्या मुळे एकुणच  त्या वाड्याच्या भींतीला एक पुरातन रुप आलेलं. 

हे आता गाड्या वाड्याच्या दिशेने वर चढवू लागले. फार नाही २०-२५ फुट गेल्यावरच यांनी वाड्याची संरक्षक भींत ओलांडुन आत प्रवेश केला.  या क्षणी अंगावरुन गार वार्‍याचा झॊत गेल्यासारखं सगळ्यांनाच जाणवलं. पण ट्रिप च्या मुड मध्ये यांनी कसलाही विचार करायचे कष्ट घेतले नसावेत.  किमान २०-२५ फुट मोकळ्या जागे नंतर समोर साक्षात तो वाडा ऊभा होता.


एवढी मस्त भक्कम वास्तु अशी दुर्लक्षीत का असावी ? हा प्रश्न यांच्या डोक्यात नाही म्हटलं तरी आलाच.  हायवे पासून फार तर ३०-३२ किलोमिटर आत, आजु बाजुने वनश्री नाही म्हटलं तरी झाडं वगैरे खुप होती.  वाड्याचा परिसर विस्तीर्ण होता,  एखादं अत्याधुनिक रिसॉर्ट करण्याजोगी जागा.   इथे येऊन फार मोठी चुक केली नाही हे सगळ्यांनाच जाणवलं.   एकमेकांशी बोलत मग गृप सभोवतालचा परिसर न्याहाळत फिरु लागले. अर्थात दक्षीणेला असलेल्या प्रचंड विहिरीशिवाय भींतीच्या आत काहीही नव्हतं.

ती पोरं म्हणाल्या प्रमाणेच  विहीर प्रचंड होती. पाणीही भरपुर.. फार फार तर १०-१२ फुटावर पाणी होतं.. शांत  पण स्वच्छ. विहिरीच्या आतल्या बाजुने काही झाडं येऊन चक्क वर डोलत होती.  बाकी सगळ्याच पडीक विहिरंच्या आतुन असतात  तसे काळपट हिरव्या शेवाळाचे थर इथेही होतेच.   खटकणारी एकच गोष्ट म्हणजे जवळपास चार फुट दगडी भिंत भक्कम चुन्यात बांधुन कडं केलेल्या त्या विहीरीअर ना रहाट होता ना पाणी काढायला काही साधन..

पाणी हवंच असेल तर काहीतरी जुगाड करणं याशिवाय पर्यान नव्हता.  विहीरीला प्रदक्षीणा घालत असतांनाच एका ठीकाणी तण मोडलेलं डिस्टर्ब झालेलं पाहुन मंडळी तिथे गेली आणी एकमेकांकडे पाहुन मस्त हसली... कालच्या गॅंग ने इथे मस्त मजा केलेली दिसत होती.   बियर च्या बाटल्या, कुरकुरे ची अनेक रिकामी पाकिटं, सिगारेट ची थोटकं  तसंच अक्वाफीना च्या बर्‍याच रिकाम्या बाटल्या.  जुन्या / प्राचीन रहस्यमय अशा त्या परिसरात आधुनिक जगातले जिन्नस पाहुन पोरं खुष झाली.

“चला राव तो वाडा पाहु या की... बाहेर फक्त भिंत, वाळकं गवत, झाडं झुडुपं आणी विहीर आहे. “  इती अपुर्व.

“ चला प्रवेश करु “
“ कुलुप असलं तर ? “  शुभांगी ची शंका.
“ असलं तर असलं .... मग आत नाही जाता येणार ..परत फिरू”   निलेश.

अर्थात असं काहिही झालं नाही. वाड्याच्या एका बाजुला भक्कम लाकडी दरवाजा होता, आणि तो फक्त लाकडी कडीनेच बंद होता.  टिम दरवाज्यासमोर होती.  अतिउत्साहाने निलेश कडी उघडायला गेला मात्र..... अपुर्वने त्याला सावध केलं ..
“ महाशय जरा सांभाळुन.... आत काय असेल माहीत नाही ... बेदरकारपणे नका उघडू”
“ हॅं काय असणार आत ? बाहेरुन कडी आहे म्हणजे आत कुणीही नाही असाच अर्थ होतो मित्रा”
“ यु नेव्हर नो.... काही नाही तरी श्वापदं / काही घातक पक्षी / साप काय वाट्टेल ते असु शकतं... “

काळजी घेतली पाहीजे याची जाणीव करुन घेत यांनी लाकडी कडी सरकवली ...  गंम्मत म्हणजे ती सहजगत्या उघडली... सस्पेन्स चित्रपटाप्रमाने गुढ करकर आवाज वगैरे काहीही झाला नाही... यांना अपेक्षा असावी अशाचीच पण तसं काही न घडल्या मूळे  आश्चर्याने एकमेकांकडे बघतच यांनी दरवाजा लोटला आणि  प्रचंड द्चकले.   दरवाजा उघडतांना मात्र यांना अनपेक्षीत असा गुढ करकर आवाज आलेला होता.

समोर एक ओटा, अर्थातच दगडी बांधकाम. आणि एक मोठा आणि बाजुला दोन दोन लहान दरवाजे दिसत होते.  वाळलेलं तण, काळं दगडी बांधकाम आणी स्वच्छ सुर्यप्रकाश हे कॉंबीनेश मोठं अजब वाटत होतं.  यातल्या कुठल्या दरवाज्यातुन आत पहावं असा प्रश्न पडत असतांनाच उष्ण वार्‍याची झुळूक यांच्या अंगावर काटा आणुन गेली कारण आजुबाजुचं वातावरण भर दिवसाचं उन असुन सुद्धा लक्षणीय थंड होतं.


त्याचं काय आहे अशा जागेत आलं नं की आपण उगाचच प्रत्येक गोष्ट फार सिरियसली घेतो... जुई म्हणाली.. सगळ्यांनाच ते पटलं.  हळू हळू आपण बिनधास्त होत जात आहोत / केले जात आहोत हे मात्र कुणाच्याच लक्षात येत नव्हते.  सगळ्या गोष्टी कशा नॅचरली होत होत्या कुणालाच संशय यायचं कारण नव्हतं.

ठरल्या प्रमाणे सहा च्या सहा लोकांनी मोठ्या दरवाज्याची बाहेर ची कडी उघडुन आत पाहिलं.  अर्थातच आत अंधुक प्रकाश होता.  वरच्या बाजुने व्हेंटीलेटर टाईप खिडक्यांमधुन जेवढा प्रकास येणं शक्य होतं तेवढा प्रकास आत होता.  काही मिनिटं डॊळे मिचकावण्यात गेले आणि मग कमी प्रकाशाला सरावले.  या खोलीची / हॉल ची उंची किमान २५-३० फुट तरी असावी. हॉलच तो.. पण आश्चर्य म्हणणे संपुर्ण मोकळा.  धुळ / कोळीष्टकं  सोडली तर इथे काहीही नव्हतं.  ज्या मुख्य दरवाज्यातुन हे आत आले त्याच्या समोर २ डाव्या बाजुला ३ आणी उजव्या बाजुला ३ अशी बंद दारं दिसत होती.

आयल काय भुल भुलैय्या आहे का हा ? एक दरवाजा उघडुन आत आलं की पुढे पुन्हा अनेक दरवाजे ?   अपुर्व म्हणाला. सगळ्यांनाच ते पटलं असावं. कदाचित अजुबाजुला रहायच्या जागा आणी या हॉल मध्ये पुजा अर्चा किंवा यज्ञ वगैरेंसाठीची व्यवस्थाही असु शकेल या विचाराने आता आलोच आहोत तर खोल्याही पाहुन टाकु असा विचार पारीत झाला.  अपुर्व चं डोकं जास्त चालायला लागलं ...

“ एक मिनिट यार... मोबाईल्स आहेत जरा त्या प्रकाशात पाहणी तर करुया की... “ हे पटलं सगळ्यांनाच.  सहा मोबाईल च्या फ्लॅश लाईट्स मध्ये पाहणी सुरु झाली. तसं काहिही विषेश दिसत नव्हतं पण हॉल च्या मध्यभागापाऊन सगळ्या खोल्यांच्या दिशेने पावलं गेलेली यांना स्पष्ट दिसली.

“ अरे ते पहा डाव्या बाजुच्या त्या खोलीच्या दिशेने पावलं नाहीत. “
“ अरे याचा अर्थ या सात खोल्यातच त्यांची तंतरली असेल आणि आठवी पहायची त्यांची हिंम्मत झाली नसावी”
“  येडे आहात राव असं काही पाहिलं असतं तर ते बोलले नसते का आपल्याला ? “
“ ते पण खरंच... असो.. तर ती खोली आधी पहायची म्हणता ? ओके.. आपल्याला काय सगळ्याच पाहुन घेऊ... “

असले डायलॉग झाल्यावर मंडळी  आपोआपच त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली.  इतर दरवाज्यांप्रमाणेच इथेही ना कुलुप होतं ना दरवाजे घट्ट बसले होते. आत अपेक्षेप्रमाणेच थोडीशी अडगळ काही लाकडी सामान, पेट्या वगैरे होतं.  थोड्या फार फरकाने सात खोल्यात तेच ते प्रकार पाहिल्यावर आठवी कशाला पहावी असाही विचार पोरांच्या मनात आला पण आता आलोच आहोत तर ती सुद्धा पाहुन टाकु म्हणून हे त्या खोली समोर आले. 

दरवाजा उघडताच ते चमकले... गार वार्‍याची झुळुक आली पण त्या बरोबरच आला तो थंड कुबट बास. अंगावर काटे आले पण पाहुच म्हणून ते वार्‍याच्या दिशेने काळजीपुर्वक पुढे जाउ लागले. अपुर्व नेमका मागे का राहीला हे त्यांच्या लक्षाथी आलं नाही.   चार पावलं पुढे गेल्यावर शुभांगी केतकी आणि जुई तिन्ही चित्कारल्या. त्यांच्या समोर भक्कम लोखंडी सळ्यांची मजबुत जाळी होती आणि त्यातुन बाहेर पाहिल्यावर ते विहीरीच्या जवळ्पास पाण्याजवळ होते. अंदाजाने जाळी हलवुन पाहीली पण ती खुपच भक्कम होती आणि मजबुतीने दगडांच्या भिंतीत बसवलेली होती.  खोलीमध्ये अंधार आणि जाळीबाहेर विहीरीत पडलेल्या प्रकाशामुळे दिसणारा पाण्याचा भाग !!  असलं दृष्य यांनी कधी स्वप्नातही पाहिलं नसावं.  या वेळी मात्र भितीची एक लहर त्यांच्या शरीरातुन गेलीच.


प्रकार खुपच अनपेक्षीत होता. एवढ्यात मागे राहिलेला अपुर्व या तिघींच्या चित्कारण्यामुळे त्यांच्या जवळ आला आणि ते दृष्य पाहुन कमालीचा सावध झाला.

एक मिनिट यार जरा खिडकीबाहेर प्रकाश टाका .... तो म्हणाला. सहा मोबाईल्स च्या प्रकाशात व्हिजन बर्‍या पैकी क्लीयर होतं. या खोलीची एक भिंत ही विहिरीच्या भिंतीशी कॉमन असणं अपुर्व ला मुळीच पटत नव्हतं. पण तसं होतं खरं.

“ तुमच्या लक्षात आलं का ? आपण ओटा चढुन खोल्यांमध्ये आलो. विहिर जमिनिच्या लेव्हल ला आहे..मग याच खोलीची ही भिंत जमिनिपासून आठ नऊ फुट खाली कशी ??? “  आपण कुठेही न उतरता खोल आलोच कसे ? काय असेल ते असो पण भुमितीला / तिच्या नियमांना  फाटा देत काहीतरी केलं गेलंय इथे. आपल्याला ही खोली जरा निट पाहीली पाहिजे “

इन फॅक्ट बाकीचे आता घाबरत चालले होते. अपुर्व ने बोललेला एक एक शब्द कानात आपटत होता... भीती वाढवत होता, काळजी वाढवत होता.  खरंच ते कुठेही उतरले नव्हते,  मग त्या जाळीतुन विहिरीत १२-१५ फुटावर असलेलं पाणी कसं समोर होतं ? गजांच्या खिडकीतून गार वारा आणि कुबट वास नॉन स्टॉप येतच होता.   एवढ्यात केतकी चा आवाज आला आणि ते तिच्या दिशेने गेले.  मोबाईल च्या प्रकाशात केतकी एका रांजणासमोर उघी होती.  जवळपास पाच फुट उंच रांजण.  कधीकाळी वाड्यात खुप जण राहत असावेत आणि पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था नेमकी विहिर असलेल्या खोलीस असावी यात मात्र कुणालाच काही फार आश्चर्य वाटलं नाही.

रांजण कशाने तरी बंद केलाय रे.... केतकी म्हणाली.  काही गरज होती का खरं तर ? पण अपुर्व लगेच तिच्या जवळ जाऊन सगळं न्याहाळत तो रांजण नक्की कसा बंद आहे याची पाहणी करु लागला... 

“ हात तिच्या मारी... साध्या दोर्‍यांनी तोंड बंद केलंय गं... “ असं म्हणत त्याने दोर्‍या सोडायला सुरुवात केली सुद्धा.

“ ऎ आधी मी पाहणार हं.. मी शोधलाय हा रांजण”

“ ओके यार तु पहा.. काय असाणारे त्यात ? पाणी तर नसेलच ना ? “ ह्या ह्या ह्या.  या दोघांचं हे सुरु असतांना बाकिचे चार फकत बघत होते.  अपुर्व दोर्‍या सोडवतच होता. पण त्या काही संपत नव्हत्या.  “ अरे काय द्रौपदीच्या साडीपासून या नाड्या केल्यात का राव ? संपतच नाहीत.. अपुर्व च्या या वाक्याने सगळेच मनमुराद हसले.  सगळ्यांचं हसणं संपल्यावर आणखी कुणीतरी दुरवर हसलं हे मात्र कुणाच्याही लक्षात आलं नाही... म्हणजे ऎकल्या सारखं वाटलं पण आपल्याच हसण्याचे प्रतिध्वनी विहीरीतुन आले असावेत असा त्यांनी समज करुन घेतला..

शेवटी एकदाच्या त्या नाड्या कम दोर्‍या संपल्या, चक्क तोंडावर चामडं ठेवुन घट्ट बांधलेलं रांजण  !! चामडं दुर करताच काही पाहण्या आधीच  एक जंगली वास, पालपाचोळ्यांचा असतो तसा आला आणि दूरवर नगारे वाजत आहेत असा स्पष्ट आवाज सगळ्यांना ऎकु आला.


वातावरण एकदम गुढ झालं. पोरं स्तब्ध झाली.  इथुन परतायचं ना ? पण नाही अपुर्व केतकी आणि शुभांगी अति चौकस, त्या रांजणात काय आहे हे डोकावुन पाहण्याची काहीही गरज नव्हती.  पण यांनी एक एक करत आत काय आहे हे पाहुन घेतलं. तसं काही नव्हतंच. काही छोटी छोटी मडकी अशीच कशाने तरी बांधलेली आत ठेवली होती.  या रांजणातुन वास मात्र खुप वाईट उग्र असा येत होता... आजवर हा वास या तिघांनी कधीही आणि कुठेही घेतला नव्हता.  असख्य झालं त्यांना आणि घाईघाईत मागे फिरतांना अपुर्व च्या हातातलं ते छोटं मडक रांजणात पडलं आणि बहुतेक फुटलं असावं.

वेळ आणि एनर्जी वाया न घालवता हे आता बाहेर पडु लागले उगाचच आपण एवढे दरवाजे ओलांडुन आत आलो नव्हतो पण जातांना लागत आहेत असाही त्यांना भास झाला. मुलं बाहेर पडले आणी बर्‍याच गोष्टी जाणवल्या. आपण काही तास वेगळ्याच जगात असल्याचं त्यांना पुन्हा माणसांत आल्यावर जाणवलं.  एका ढाव्यावर फ्रेश झाले, चहापाणी आटोपुन गाड्या मुंबईच्या दिशेने पुन्हा धावु लागलया.


डोळे उघडल्यासारखं झालं आणि हे जणु भानावर आले. क्षणभर कळेना कुठे आहोत.  समोरच गंभीर चेहेर्‍याने महंत बसलेले. कमालीची काळजी त्यांच्या चेहेर्‍यावर दिसत होती.  हे लोक बावचळलेत हे लक्षात असुनही काही वेळ महंत शांत पणे बसुन राहीले.  हातानेच त्यांनी यांना शांत बसुन राहण्याची खुण केली.  उदबत्त्यांचा वास आता मात्र येत नव्हता हे सगळ्यांच्या लक्षात आल.

दहा पंधरा मिनिटांचा तो पॉज अत्यंत जिवघेणा वाटला सगळ्यांनाच.

“ ह्म्म तर असं झालं एकंदरीत “  महंत म्हणाले.

“ काय ? यांना काहीही कळेना... “

“ सांगतो.... मघाशी मी लावलेल्या उदबत्त्या साध्या नव्हत्या.  त्यांच्या प्रभावातच त्या ट्रिप ला तुम्ही काय काय केलंत  ते पाहीलंय मी. “  का वागता रे असं वेड्यासारखं ? अरे जे नाही कळत ते नाही.. माहीती ज्ञान असल्या शिवाय नको तीथे नाक का खुपसायचं ?  एकच सांगतो अत्यंत वाईट जागेत तुम्ही नुसतेच गेला नाहीत तर यथासांग सगळं जागवुन आला आहात.

असो पाहु या काय करायचं ते.

महंताचे शब्द मांडुन ठेवलेल्या धोक्याची कल्पना देऊन गेले.

तिथे गेल्यावर काय काय घडलं ते जाणुन घेतलंय फक्त  मला कुतुहल आहे ते तुमच्या आधी जाऊन आलेल्यांचं.  यात शक्यता दोन आहेत ते गेले तिथल्या वातावरणाचा प्रभाव पाहुन नुसतेच मौज मजा करुन आले आणी तुम्हाला भेटले. किंवा त्यांच्यावर वेगळा प्रयोग झाला आणि ते अधिकाधीक लोकांना या जागेकडे जायला सुचवणारे माध्यम म्हणून अनंत काळ भटकत राहतील. काही गोष्टी मला फार धुसर दिसल्या त्यात या लोकांच्या चेहेर्याबद्दल फार काही दिसलं नाही . याचाच अर्थ तुमच्या पैकी कुणीही त्यांना निटसं पाहिलं नाहीये.  आलीशान मोटर मधुन आलेले ते .. नक्की कोण ?

आणी मला हेच मुळी पटत नाही. तुमच्या पैकी कुणीही त्यांना निट पाहिलं असतं तर मला चेहेरे नक्की दिसले असते तेवढा विश्वास आहे मला माझ्या या सिद्धीवर /  साधनेवर.

“ चला .............  “  महंत उद्गारले.
“ कुठे ?
“ जिथे तुम्हाला ते लोक दिसले... आणी तुम्ही त्या विषारी अंमल असलेल्या वाड्यावर गेलात”
“ १०० किलोमिटर तरी आहे ती जागा”
“ असु द्या तुमच्या जिवापेक्षा जास्त नाही”

घरी फोन्स गेले, आणी आता महंतांसह गाडी हायवेवरुन शक्य तेवढ्या वेगाने जाऊ लागली.... घाटा आधीच्या एका टर्न वर ती टपरी होती आणी मुख्य म्हणजे ती जागा यांना चांगलीच ठाऊक होती.

प्रवासात महंतांनी पुन्हा एकदा या सगळ्यांकडुन्न काय काय घडलं ते जाणुन घेतलं. पदोपदी ते गंभीर होत गेले हे मात्र खरं..

दिड तासातच म्हणजे दुपारी साधारण बारा साडेबाराच्या सुमारास ते स्पॉट ला पोहोचले.   अर्थातच तिथे काहीही नव्हतं.

“ पाहीलंत .. हा सगळा ट्रॅप होता तुम्हाला त्या वाड्यावर पोहोचवण्याच्या.  माझ्या ते तेव्हाच लक्षात आलेलं. कारण संमोहनात तुम्ही मला न वडा पाव खातांना दिसलात ना कुणी येऊन तुमच्याशी बोलल्याचं दिसलं. ... जे अस्तित्वात नाही ते कसं दिसणार होतं ? “

“  पण आम्हाला तर वडा पाव त्याची चव तो खमंग वास सगळं आजही आठवतंय “
“ हो आठवेलच ... कारण तुम्ही ते अनुभवलंय.. भासमय का असेना त्या प्रतिमा तुमच्या डोक्यात आहेतच. मला शंका आली कारण तुम्ही  या जागी थांबल्याचं एक मेकात बोलल्याचं हातवारे केल्याचं दिसत होतं पण ना कुठला स्टॉल होता ना कुठला दुसरा गृप. इथुन अचानक तुम्ही या वळणापर्यंत आलात आणि एकदम या गर्द झाडा झुडुपातुन कच्च्या रस्त्याने गेलात. “

याचाच अर्थ असा की हा खुप प्रभावी सापळा आहे.  कसलीही शंका येणार नाही असा.  मी खात्रीने सांगतो.  वाड्यावरची प्रत्येक गोष्ट तुम्ही गेलात तेव्हा जशी होती तशीच असेल फक्त ते रांजण... जे तुम्ही उघडलेय.  मी तयारीनेच निघालोय पण तरीही आज आपण तिथे जाणार नाही.  मला अजुन काहीतरी कराव लागेल. चला परत जाऊयात.

सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा शक्यतो विनाकारण बाहेर पडु नका, माझ्या घरी मी  अभिमंत्रीत गंडे देतो ते कधीही काढायचे नाहीत हे लक्षात असु द्या.  धोका नक्कीच गंभीर आहे.  मला शक्यतो अपुर्व / शुभांगी आणि केतकी ला भेटायला हवंय.  मुख्यत्वे आपण आधी शुभांगी केतकी यांना सुरक्षीत करुया, मग अपुर्व कडे जाऊ.  सगळ्यात कठीण काम आहे ते केतकीला सुरक्षीत करायचं तिचे वडील तिला कोल्हापुर ला घेऊन गेलेत ना ?   पण पाहु काय करायचं ते. आधी घर गाठू बरीच कामं करावी लागणार आहेत.


घरी पोहोचताच महंतांनी यांना दंडावर बांधायला गंडे दिले,  केतकी च्या घरी बोलुन हा गंडा कसा देता येईल यावर देखील तोडगा निघाला  जुई चा भाऊ त्याच्या मित्राला गंडा घेऊन कोल्हापुर ला पाठवणार होता.  असह्य धावपळीनंतर आणि मानसिक रित्या खचुन गेल्यावरही कुठे तरी डोक्यावरचा ताण कमी झालाय हे पोरांच्य लक्षात येत होतं  या वेळचा विचार केलाच तर मुलांना जेमतेम धोक्याची माहीती मिळाली होती.  धोक्याची घनता, करावे लागणारे उपाय हे सगळं अनाकलनीय होतं.  गंडा बांधल्यावर मात्र भीतीची जाणीव स्पष्ट होऊ लागली आणि हेच राजेश ला खटकलं.

“ काका,  राग नका येऊ देऊ आम्ही नकळत चुकलोच आहे पण अचानक मनाला डोक्याला भीतीची तिव्र जाणीव होऊ लागलीये आणि ती सुद्धा तुम्ही गंडा बांधल्यावर  हे कसं ? उलट रिलॅक्स वातायला हवं होतं ना ? “

महंत मंदपणे हसले...  “ अरे हे अभिमंत्रीत गंडे काही जादुचे नव्हेत.  हे इथुन पुढे तुमचं रक्षण करायला मदत करणार आहेत, आणि म्हत्वाचं म्हणजे तुम्हाला भानावर आणणारे आहेत”   थोडक्यात तुम्ही अंमलाखालीच होता.... प्रयोग झालेलेत तुमच्यावर तुमच्या ध्यानी मनी नसतांना तुमच्या थ्रु काही गोष्टी करुन घेण्यात येणार होत्या. “

अपुर्व आणि केतकी यांनी प्रखर मानसिक विरोध केला असावा, शुभांगी ने थोडासा म्हणून त्यांना लगेच बाह्य त्रास सुरु झाले. केतकी आणि अपुर्व यांच्यावर तर हल्लाच झालाय. अपुर्व नक्की  कोणत्या स्टेज ला आहे हे मी आज रात्री साधनेत जाऊन पाहणार आहे. केतकी ला गंडा उद्या दुपार पर्यंत मीळेल ना ? तोवर त्रास वाढत जाईल.  गंडा बांधल्यावर शुभांगी पाहता पाहता नॉर्मल होईल. .....................   एका दमात महंत म्हणाले आणि धोका किती गहन आहे याची बाकीच्यांना जाणीव होऊ लागली.

जो तो आपापल्या घरी पोहोचला आणि फार काही न बोलता आपण खुपच नॉर्मल आहोत असं दाखवत  परिस्थीती बाबत युज्ड टू व्हायचा प्रयत्न करु लागले.


आपण ओरडलो हे अपुर्व च्या ध्यानात आलं.. आता अजुबाजुने डॉक्टर्स आणि नर्सेस धावत येतील त्यांचे चेहेरे जणु त्यांनीच काहीतरी चमत्कार केल्यासारखे  होतील ....  स्वत:वरच ते खुष होतील काही यंत्रांवर कसले तरी आकडे पाहतील आणी आपल्या शरिरावर आणखी काही छिद्रं  पडततील या विचारांनी तो अस्वस्थ झाला.

पण तेवढी प्रचंड हलचाल नाही झाली. बहुदा आजुबाजुला कोणीही नसावं.  असो.. पण काही अनुभव आपल्याला जरा वेगळे आल्याचं अपुर्व च्या लक्षात आलं.. इथे का कुणास ठाऊक काही ओळखीचे लोक्स  आपल्या मदतीला आल्याचं त्याला जाणवत होतं.  एवढ्यात काही   जण बहुदा हॉस्पीटल चेच लोक असावेत त्यांचे आवाज येऊ लागले...

“ बिलिव्ह मी डॉक्टर पेशंट शुद्धीत आलेला... मी स्वत: त्याला हलचाल करतांना पाहीलं पण माझ्या आवाजामुळे  डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी तडक तुमच्या कडे आले. “

“ ओके लेट मी चेक.... “  काय विचित्र केस आहे ही.... चेक करावं तर सगळंच नॉर्मल असतंय एक सुद्धा अ‍ॅबनॉर्मल गोष्ट मी आजवर पाहीली नाही...... हे पहा बीपी नॉर्मल.  बिट्स आयडीयल आहेत.  फक्त डोळ्यांकडुन काही रिस्पॉन्स नाही.  मे बी दृष्टी गेली कि काय हे समजत नाही.

अपुर्व ला भयंकर राग आला,  तिच्यायला मला अंधळा ठरवतोय ? या विचारासरशी तो रागात ह्लला... आपण तेवढंच करु शकतोय हे आता त्याला उमजलं होतंच. ...... अपुर्व च्या हलचालिंनी डॉक्टर खुपच समाधानी झाले. पण तेवढ्यात नर्स  विचित्र आवाज काढुन बाजुला झाली.

“ सर हे पहा..... “ एवढाच आवाज आला.. मग पुन्हा तसेच काही चमत्कारीक आवाज आले. 

“ काय झालं ?..... बहुदा अपुर्व च्या वडीलांचा काळजीयुक्त आवाज...............

“ रणदिवे .... काही कळत नाही.... पेशंट हलचाल करु शकत नाही.... पाहु शकत नाही..... बोलु शकत नाही.. गेले १६ दिवस इथे बेड लेडन आहे.  आत्ता आमच्या स्टाफ ला पेशंट मध्ये काही मुव्हमेंट्स ऑबझर्व्ह झाल्या... अ‍ॅकॉर्डींगली आम्ही येऊन चेक करतोय तर हे.... “

“सॉरी पण हे म्हणजे काय ? “

“ पेशंट चे हात पहा, “

अपुर्व च्या हातात त्याच्या मुठीत घट्ट पकडलेलं काहीतरी होतं.  काय ते अपुर्वलाही आठवत नव्हतं पण ते यांना दिसावं म्हणून त्याने प्रयत्नपुर्व मुठी सैल केल्या...

अपुर्व च्या हातात कसली तरी पानं होती... ताजी  उग्र वासाची जणु एखाद्या झुडुपाला ओरबाडुन त्याने ती पानं मुठीत लपवली होती

“ इंपॉसिबल.... पेशंटच्या हातात हा कसला झाडपाला आहे ?  क्रिटीकल केअर युनिट मध्ये पेशंट सुरक्षीत आहे,  विदाउट एनी मुव्हमेंट्स सिन्स लास्ट १६ डेस... आणि आता हातात ताजी पानं ?  हॉरिबल. .. कोणकोण भेटायला आलं होतं ?

अर्थात त्या एका स्टाफ नर्स शिवाय त्या वेळी तिथे कोणीही नव्हतं.  सिसी फुटेज पाहीलं गेलं काही एक्स्प्रेशन्स आणी हलचाली वगळता पेशंट नॉन स्टॉप बेड वरच होता आणी टेंपरेचर घेणे / आय व्ही लावणे या खेरीज कोणीही त्याच्या जवळ गेलेने नव्हते.  थोडक्यात अपुर्व एका अनाकलनीये दुनियेतुन काही तरी घेऊन आलेला होता ....


साधनेत ध्यान्स्थ बसलेल्या महंतांना ते जाणवलं.  इथे बाधीत स्वत: स्ट्रगल करतोय हे त्यांच्या लक्षात आलं.. आवाहन करत मग त्यांनीच अपुर्व ला काहितरी घेउन जायला सुचवलं.  अपुर्व ने ते अचुक ग्राप्स करत त्या कोंदट कुबट जागेतुन जे हाती आलं ते घट्ट पकडुन ठेवलं.

या अनाकलनीय भागातलं तो जे काही घेऊन हॉस्पीटल च्या दुनियेत जाणात ते हाहाक्कार उडवुन देईल हे महंतांना माहीत होतंच.  फक्त वेळ कमी मिळाल्याने आणी अंधार बराच असल्या मुळे तो नक्की काय घेऊन गेला हे महंतांनाही दिसलं नव्हतं.  आता त्यांनाही राहवेना... आपल्या गाडीने मग ते हॉस्पीटल ला पोहोचले.  गेले ते तडक डॉक्टरांच्या केबीन मध्ये.

ओळख होतीच.  महंतांना पाहुन डॉक्टरही जरा रिलॅक्स झाले.

काय घेऊन आलाय तो ? ...................  महंत..

कसली तरी पानं आहेत. ...... डॉक्टर

फेकली नाहीत ना ? चला आपण तिकडेच जाऊ... महंत म्हणाले.  डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवत अपुर्व जवळ कुणीही जाऊन काहीही अदला बदल वगैरे करु नका हे सांगीतलं.

दोघे अपुर्व च्या रुम मध्ये आले.. तो नेहमी सारखाच होता. महंत आणि डॉक्टरानी मग त्याच्या हातातला तो पाला काढुन घेतला. महंत शहारले... डॉक्टरांना मे बी त्यात फार काही रस नसल्या मूळे त्यांनी डाव्या मुठीमधील पानं महंतांक्डे दिली.  अक्षरश: अंगावर काटे आले महंतांच्या.  आजवरच्या या उद्योगात असं शेकडो हजारो वर्षांपुर्वीची आज या काळात असं ताजेपणासह कधीही त्यांनी पाहीलं हाताळलं नव्हतं.  त्यांच्या साठी हे एक अमुल्य होतं.  चेकिंग साठी डॉक्टरांनीही चार सहा पानं ठेवुन घेतली.

“ डॉक्टर मी खात्रीने सांगतो गेल्या किमान २०० वर्षात असली वनस्पती कुणी पाहीली नसेल.  हिचा वास पहा, केव्हा उगवली यापेक्षा  केव्हा आम्ही ही २०१६ मध्ये पाहतोय म्हणजे किती लांब प्रवास करुन आलीये हे लक्षात घेता ही साधारण वनस्पती नाही हे खात्रीने सांगतो. “

“  मला काहीच समजत नाही यात आणि  माझा तो प्रांतही नाही.... हा हा “ मी या पानांच्या प्रॉपर्टीज चेक करणार फक्त.  डॉक्टर म्हणाले.

“  ठिक आहे डॉक्टर ..पण काळजी घ्या. हात धुवा. आणि पानं अगदी कोणीही पाहु किंवा चाखु शकणार नाही अशी जागा निवडा... तुमचा पेशंट नक्की काय घेऊन आलाय हे समजे पर्यंत माझ्यावर विश्वास ठेवा... पानं सांभाळा.... एवढा प्रदिर्घ प्रवास करुन आलीत नॉर्मल असती तर करपुन जायला हवी होती...

एव्हाना महंतांना  साधारण प्रकार लक्षात आलेला होताच. फक्त या सापळ्यामागे / करणी मागे नक्की हेतु किंवा मोटिव्ह काय असावं याचा शोध घ्यावा लागणार होता. आणि त्यासाठी पुन्हा त्या जागेची व्हिजिट कंपल्सरी होती. अत्यावश्यक तयारी करुन महंतांनी राजेश आणि निलेश ला आपण तिकडे जाऊन येणार आहोत हे सांगीतलं. दोघेही तसे मॅच्युअर लगेच गाडीची व्यवस्था करुन दुसर्‍या दिवशी सकाळीच तिघेजच स्पॉट कडे जायला निघाले.

“ हे पहा,  ही भेट तशी जोखिमीची आहे. मला सुरुवातीपासून तो ट्रॅप पहायचाय. आपण या क्षणी गंडे काढुन टाकणार आहोत.  ट्रॅप मध्ये प्रवेश झालाच तर  मी तुम्हाला काहीही न बोलता संदेश देईन. गंडा खीशात ठेवायचा. संरक्षण  सोबत असेल तर ट्रॅप होणारच नाही.  असंही मी सोबत असल्या मुळे कदाचित ट्रॅप विनाच आपल्याला त्या वाड्यावर जावं लागेल.

या दोघांना आता दडपण येऊ लागलं होतं. महंत सोबत होते पण या दोघांनी यांची करामत अजुन तरी डोळ्याने पाहिलेली नसल्या मुळे कुठे  तरी एक साशंकता होतीच. साधारण त्याच वेळेत मंडळी महामार्गाच्या त्याच भागात प्रवेशली. परवा जिथे काहीही दिसत नव्हत, तिथे तोच टपरीवजा स्टॉल पाहुन महंतांचंही अंग शहारलं...   याच बरोबर काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या.  ट्रॅप सकाळीच असतो, मे बी दुपारी बारा नंतर तो दिसेनासा होतो.  महंतांनी दोघांना स्टॉल वर गाडी न्यायला सांगीतलं.  सगळं माहीत असुन पुन्हा तिथे त्यांच्यात जाणं  या दोघांना बरंच कठीण जात होतं.  अज्ञानात किती सुख असतं नाही ?

स्टॉल वर थांबल्यावर दोघेही चमकले, तोच माणुस...तिच कढई आणि जवळपास तेवढेच वडे कढईत टाकले जात होते.  तोच खमंग वास आणी तेवढ्यात आणखी एकदा चमकावं लागलं..... त्या दिवशीचीच एस यु व्ही, त्याच लोकांसोबत उतरत होती.  हे सगळं खोटं आहे हे माहीत असल्यामूळे दोघेही मजबुत टरकले होते. पण ... महंतांनी फक्त एकदा दोघांचा हात हातात घेऊन दाबला आणी जणु  घाबरु नका मी आहे.. असा संदेश दिला.  याचाच अर्थ आता या दोघांनी बोलायचं नव्हतंच.  तो गृप उतरला,  का कुणास ठाऊक पण त्या ग्रुप च्या हलचालीच अशा होत्या की महंतांना सुद्धा त्याचंचे चेहरे निट दिसत नव्हते.  क्षणभर  त्यांनी डोळे मिटुन मनातल्या मनात काहीतरी म्हणत डोळे उघडले आणि थोडे दचकले.

प्रकार खुप प्रभावी आहे हे त्यांच्या लक्षात आलं वास्तवीक महंतांनी जे मंत्र म्हटले ते मना उच्चारुन सुद्धा एका क्षणात तो अभासी देखावा ट्रॅप नाहिसा व्यायला हवा होता पण सगळं जैसे थे होतं.  राजेश आणी निलेश आवाक होऊन पाहत होते.  तिच गॅंग तीच गाडी आणि जवळ पास तसेच हास्यविनोदाचे आवाज... हे सगळंच फार भयानक वाटत होतं.  महंतांनी खुण केली, जवळ यायची.  सिद्धी पणाला लावत विचार न करता महंतांनी निलेश ला न बोलता सुचवलं त्यांच्याशी बोल.

यानंतर मात्र या ग्रुप शी बोलायला गेलेल्या निलेश च्या पदरी निराशा आली, निलेश ला पाहताच ते गोंधळले, त्यांचे चेहेरे व्याकुळ झाले आणी क्षणात तो ग्रुप त्या गाडीसह दिसेनासा झाला, मागे वळुन बघतांना रस्त्यावर महंत आणि राजेश एकटेच एका बाजुला उभे होते, ना तो वडेवाला होता ना त्याचा तो स्टॉल.


महंतांचा चेहेरा गंभीर होता, त्यांना ताबडतोप निलेश ने काय पाहीलं हे जाणुन घ्यायचं होतं.  निलेश महाप्रचंड धक्क्यात. अक्षरश: थरथर कापत होता.  त्याला हात धरुनच या दोघांनी गाडीत बसवलं प्यायला पाणी दिलं. . पाचेक मिनिटातच निलेश भानावर आला... महंतांना या गोष्टीची संपुर्ण जाणीव होती.  हा ताण  / हे बदल सामान्य मानवी मनासाठी – मेंदुसाठी ठिकर्‍या करणारे असतात यात त्यांना कोणतीही शंका नव्हती.  निलेश च्या चेहेर्‍यावर थोडसं स्मीत आल्यावर महंतांनी आधी या दोघांच्याही  दंडावर ते गंडे बांधले, कारण त्यांनी ट्रॅप मध्ये प्रवेश केलेलाच होता.

“ ठीक आहेस ना निलिश ? .... हवं तर थर्मास मधली कॉफी घेऊयात. “
“ हो .. चालेल... मला घशाला प्रचंड कोरड पडलीये. “

कॉफी झाली... महंत साधारण थोड्या थोड्यावेळाने घड्याळ बघत होते.  हे सगळे आले तेव्हा जेवढा वेळ यांनी या भासमय टपरीवर घालवला, तेवढ्याच वेळात त्या वळणा ला लागुन वाडा गाठायचा होता.  निलेश सांगु लागला,

“ मला पाहताच त्यांचे चेहेरे एकदम काळवंडले... घाबरले, व्याकुळ झाले. आणि जणु त्यांच्या इच्छे विरुद्ध ते दिसेनासे झाले. “

“ हम्म्म... ते बिचारे तुमच्या पेक्षा जास्त दुर्दैवी जीव आहेत. या ट्रॅप आणि नंतर च्या करणी मुळे अनंत काळापर्यंत असेल या ट्रॅप चा हिस्सा झालेले.  पण निलेश चा चेहेरा पाहिलेला वाटताच कुठे तरी तो ओळखुन त्यांना काहीतरी जाणवलं आणी तो भाग मात्र ट्रॅप चा हिस्सा नसल्या मुळे त्यांना गायब केलं गेलं. “

“ पण एक आहे असे जे कोणी असतील त्यांचा वापर ही जहरी करणी / योजना / उद्वस्त करतांना आपल्याला करता येणार आहे.  चेहेरे क्रोधीत झाले असते तर ते  पुर्णपणे करणीच्या ताब्यात आहेत असं समजावं लागलं असतं पण व्याकुळता सहानुभुती दाखवते.  असे अनेक जण सापडु शकतील आणि जास्त असले तर आपलं काम सोपं होईल. आपण त्या जागेवर अशांचीच मदत घेणार आहोत. “

चला निघु या तुम्हाला रस्ता माहीत आहे.  वाडा सुद्धा तिथले डीटेल्स सुद्धा.. सगळं या प्रवासात रिकॉल करुन ठेवा, मनातच.. अत्यंत गरज असल्या शिवाय एकमेकांशी बोलायचं नाही.  शक्यतो खुणांनीच सुचवायचं. या प्रकारात तुम्ही माझे गाईड आहात हे लक्षात ठेवा.

“ महंत जी एक काम करु या का ? आपल्या सगळ्यांकडे सेल फोन आहे खुणांपेक्षा जर नेटवर्क असेल तर व्हायब्रेट मोड वर मेसेज ने संपर्क करुयात की “

महंतांनी चमकुन राजेश कडे पाहीलं   मिशन मध्ये तो शत प्रतिशत इनव्हॉव्हच झालेला नाही तर लढायला सिद्ध आहे हे त्यांच्या लक्षात आलं. जी गोष्ट आपल्या लक्षात आली नाही ती राजेश ने सुचवुन जणू एक नवं हत्यारच बहाल केलेलं होतं.


वाडा नजरेच्या टप्प्यात येताच गाडी आधी थांबवायची बरं का ... महंत म्हणाले.. त्यांनीच मग समजावून सांगायला सुरुवात केली...

हा सापळा ही करणी खुप प्रभावी आहे, जुनी आहे, जहरीही आहेच.  कुठे तरी खुप जास्त जण यात फसले असायची शक्यता आहे.  करणी यंत्रावर सहसा प्रभाव पाडत नाही पण... इथे एक आलिशान मोटारगाडी तुमच्या  सोबत मलाही दिसली याचा अर्थ करणी दिवसेंदिवस अपग्रेड होतेय. तिची व्याप्ती वाढतेय.  एक शंका अशीही आहे की हे दुर्दैवी जीव फक्त वापरासाठी असुन या परिसरात प्रत्येक जण अश्या काही गोष्टी बघतो की मास हिप्नॉटीझम केलं जातं.  यामुळेच कदाचित सगळ्यांनाच एक दृष्य दिसतं.

पॉसिबल आहे की काहीजण याही ट्रॅप मध्ये न अडकता पुढे निघुन गेले असणार,  कदाचित हायवे वरची कुठली तरी एक गोष्ट अशी असेल जी पाहिल्याशिवाय हे भास होत नसावेत.  तुमच्या पैकी कुणीही एकाने जरी ही वस्तु पाहिली नसती तर तुम्ही कदाचित ट्रॅप मध्ये अडकला नसातात.  पहील्यांदा आपण आलो तेव्हा इथे काहीच नव्हतं याचा अर्थ तेव्हा ती वस्तु / जागा आपण कूणीही पाहीली नाही ... किंवा एका विशिष्ठ वेळेत हा ट्रॅप अ‍ॅक्टीव्ह होतो.  वेग वेगळ्या वेळात वेगवेगळ्या दृष्यांचेही सापळे असु शकतील .. पण तुर्तास इथे सापळे जागोजागी असणारेत हे महत्वाचं.  सहसा कशावरच विश्वास ठेवायचा नाहीये.  आपण तिघांनी मिळूनच हे उद्वस्त करायचेय आणि ते सुद्धा आजच आत्ताच.

आणि हो दडपण घेऊ नका,  १००% टक्के ही करणी टप्प्या टप्यात होतेय.  अन्यथा तुमच्या पैकी सगळे जण त्या वाड्यातुन परतच आले नसता.  तेव्हा घाबरु नका. ते तुम्हाला तसंच मला तर ओळखतीलच.  त्यांना धोक्याची जाणीवही होईल. आज मी थोडंसं ऑफ बिट काम करीन.  मी सांगत नाही तोवर तुम्ही गाडीबाहेर यायचं नाही. आणि मी दोन्ही हात वर करुन माझ्या असहाय्यतेची खुण केली की या पिशवीमधील ही पवित्र रक्षा तुम्ही घोका पत्करत माझ्या दिशेने फुंकायची आहे.  सहसा हा प्रसंग येणार नाहीच पण शत्रुला कधीही मी कमी लेखत नसतो आणि त्यासाठीच शक्यतो पुर्ण तयारीत असतो.

ही रक्षा घेऊनच मी का जात नाही ? हा प्रश्न तुमच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसतोय पण ... नुसती लावली तरी हे समोर येणार नाहीत... तुम्हीही खाली येतांना भालप्रदेशावर रक्षा लावुनच येणार आहात.  येतांना तुमच्या कडे कोणतीही  मंत्र सिद्धी वगैरे नसल्या मुळे आठवेल ती स्तोत्र मनातल्या मनात म्हणा, किंवा देवाचं स्मरण / कुलदेवीचं स्मरण / कुलदैवताचं स्मरण करा, आपोआप शक्ती मिळतेच.

सुचना दोघेही  जण काळजी पुर्वक एकत होते.. वाटतंय तेवढं कठीण नाही हे वाटतांनाच लढायची जिद्दही येत होती... निलेश ने अचानक ब्रेक लावला....  समोरच वाड्याची  भिंत दिसत होती..
महंत उतरले ... आजुबाजुला बघत त्यांनी गाडीभोवती एक कुंकवाचं वर्तुळ काढलं. कसले तरी मंत्र म्हटले. आणि खुणेनीच दोघांना सोबत या असं सुचवलं.  

आता आपण पुन्हा सगळं निट पाहणार आहोत. जराही बदल जाणवला तर मला सांगा.. आणी  हो बोललात तरी चालेल.. इथे असलेली करणी आपल्याला नक्कीच अंडर एस्टीमेट करतेय. मी मंत्र म्हटल्यावर काही ना काही दृष्य बदल मला जाणवायला हवे होते... किंवा प्रत्यक्ष त्या कक्षेत प्रवेशल्या शिवाय  अंमल जारी होत नसेल. तेव्हा घाबरु नका, तुम्ही येऊन गेलात माझ्या पेक्षा तुम्ही जास्त चांगलं न्याहाळु शकणार आहात.

ज्या अर्थी तुम्ही  सहीसलामत घरी पोहोचलात त्या अर्थी लगेच जिवघेणा धोका संभवत नाही असं वाटतंय पण तसं वाटलंच तर धावत जाऊन गाडीत बसायचं आहे.  गाडी संपुर्ण सुरक्षीत केलीय... कोणतीही अघोरी गोष्ट /शक्ती  / शरीर ते कुंकवाचं वर्तुळ ओलांडु शकणार नाही.  थोडीफार बाधा तुम्हाला असेल तरी ते पेटेल तुम्ही उडी घेऊन आत जायचे एवढे लक्षात घ्या. तुम्हाला यातुन कोणतीही इजा होणार नाही.

तोच बाडा तेच वर्णन आणि तोच गारवा..... मुख्य दरवाज्यातुन आत येताच महंतांनी आजुबाजुला कटाक्ष टाकले... आणि काहिही न बोलता ते विहिरीच्या दिशेने निघाले.  अक्षरश:  काहिही फरक नव्हता.  विस पंचवीस दिवसांपुर्वी विहीरीजवळ पडलेले जिन्नस.. बियर च्या बाटल्या, मिनरल वॉटर च्या रिकाम्या बाटल्या जशा च्या तशाच होत्या.  किमान  त्यांच्यवर धुळ असणं आवश्यक होतं.. इथेच हे सगळं कृत्रीम असल्याची जाणीव  दोघांच्या अंगावर काटा आणून गेली.

ठरल्या प्रमाणे आता महंत मुख्य वाड्यात प्रवेश करायला निघाले.  दोघंजण सोबत होतेच. मनातुन भयंकर भिती होती पण सोबत महंतांसारखा सिद्ध माणुस असल्यामुळे तसे निर्धास्तही होतेच.  काहीतरी थरारक / जगावेगळं होणार आणी आपण त्याचे साक्षीदारच नव्हे तर सक्रीय   सहभागी असणार याचं आता त्यांना अप्रुप वाटु लागलं होतं.  महंतानी ते ताडलं आणि एक छान स्माईल त्यांनी या दोघांना दिलं. तो एक आधारच वाटून मंडळी आणखी टोणगी झाली.

अत्यंत सावधपणे महंतांनी मुख्य दरवाजा ढकलला या वेळी ते तीन प्रखर टॉर्चेस घेउन होते.  या प्रखर प्रकाशात आता अनेक गोष्टी नव्याने दिसत होत्या.  मुख्य दरवाज्यातुन आत आल्यावर त्या हॉल मधुन समोर दिसणार्‍या खोल्या उतारावर होत्या म्हणजेच ते ते दरवाजे उघडुन आत गेल्यावर  तुम्ही अजुन अजुन खोल जात होता. शेवट्च्या त्या खोलीतुन विहीरीपर्यंत आठ फुट खाली  कसे गेलो याचं गुढ उलगडलं.

बाकिच्याही खोल्या अशाच असणार हे यांनी अंदाजानेच ताडलं.  अजुनही ते मुख्य दरवाज्याच्या फार तर दोनेक फुट पुढे येऊनच पाहणी करत होते.

“बघा... पाहीलंत ? महंत स्पष्ट्पणे बोलले ......   तुम्ही सहाजण येथे येउन गेलात पण  खालच्या धुळीत एवढी पावलं नाहीयेत. पुन्हा  एकदा या पावलांची दिशा हे त्या एका खोलीकडेच जाताहेत.  थोडक्यात इथे आलेल्याने प्रथम कोणती खोली पहावी हे सुचवणारा पहिला अगदी साधा ट्रॅप आपल्या लक्षात आला.  ही आफाट उंची  सुद्धा संशयास्पद आहे.  एवढ्या उंचीची काहीही गरज दिसत नाही.  काहीतरी गौडबंगालाहे हे.  हा वाडा बांधलायच मुळी एका विशिष्ठ हेतुने.  इथे काही गोष्टी अजुन मलाही लक्षात येत नाहीयेत.  त्यांनी विहिरीचे पाणी गोड आहे सांगीतलं मग विहिरीच्या आजुबाजुला मिनरल वॉटर च्या रिकाम्या बाटल्या का दाखवाव्यात ? पाणी गोड आहे सुचवायचं पण ते काढायचं काही साधन इथे दिसत नाही.  तसंच विहीरीवर रहाट किंवा ती लोखंडी गोल पुली असते तीही नाही... तसंच विहीर साडॆचार फुट भींतीने वेढलेली आहे.. या विसंगती नसून नक्कीच काहीतरी मेख आहे या मागे.  कोणत्या तरी खोलीत पाणी काढायचं काहीतरी  मिळायलाच हवं.  चला एक एक खोली शक्यतो लवकर पण काळजीपुर्वक पाहु...  सापळ्याला विरोध त्यांच्यापर्यंत जावा यासाठी मग आधी विहीर असलेल्या खोलीतच जायचं हे ठरलं.  मंडळी त्याच खोलीच्या दिशेने जाऊ लागली.


रांजण असलेली खोली सोडता सगळ्या खोल्या यांनी पुरेश्या प्रकाशात पाहील्या. थोडीफार अडगळ वगळता फार काही फरक दिसला नाही. हे अचंबीत करणारं होतं. महंतांनाही हे निट समजत नसावं. त्यांच्या चेहेर्य़ावर नक्कीच काळजी होती.  हातानेच खुण करुन त्यांनी यांना थांबायला सांगीतलं.

“ दोन्ही हातात टॉर्च घेउन मी रांजण असलेल्या खोलीचा दरवाजा उघडेन.. फ्लॅश मोड वर तुम्ही पटापट किमान पाच सहा फोटो घ्यायचे. गरज पडल्यास नंतर मला ते उपयोगी होतील. टॉर्च च्या प्रकाशात जे चटकन दिसत नाही ते फ्लॅश मध्ये मे बी नंतर पाहता येईल.”  मिशन आता थरारक मोड ला प्रवेश करत होतं. महंत म्हणत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी त्यांना या खोलीत अपेक्षीत आहे हे दोघांनी जाणलं.

तिघंजण त्या खोली च्या दरवाज्या समोर उभे राहीले... एकमेकांकडे बघत. महंतांनी मोबाईल काढला एक मेसेज टाइप केला. पण दुर्दैव मुळीच नेटवर्क नव्हतं. त्याच क्षणी निलेश ने त्यांच्या हातातला मोबाईल काढुन तो मेसेज वाचला आणि राजेश ला पण दाखवला. आता दोघांचेही डोळे विस्फारलेले होते... समाधान एकच.. न बोलता एकमेकांना सांगायची ट्रिक त्यांना मिळाली होती. महंत या क्लुप्तीने कमालीचे खुष झाले.  आता उसंत मिळाली की अशाच प्रकारे बोलायचं हे जणु ठरलं. ते दरवाजा समोर नुसतेच ऊभे राहीले.. दार मात्र लोटत नव्हते.  कानात प्राण आणुन ते चाहुल घेत होते... ठरल्या प्रमाणे महंत आणी ते दोघे एकदम मागे वळले आणि मोबाईल मधुन पाच सहा वेळा फ्लॅश चमकले.

दोघे घाबरले होतेच. कारण महंतांचा मेसेज आणि मागे वळल्यावर समोर असलेलं दृष्य...  महंतांचा मेसेज होता....

> आपण एकदम मागे वळणार आहोत. आपल्या पाठी नक्कीच कोणीतरी असेल तुम्ही लगेच शक्य तेवढे फोटो काढायचे आहेत <

फ्लॅश ऑन करुन हे वळले पण फोटो काढण्याआधी मागे जे काही दिसलं ते पाहुन अक्षरश: थिजले.... महंत सोबत नसते / तो गंडा ती रक्षा नसती तर ... ते जागेवर हार्टफेल ने मेले असते.

त्यांच्या मागे अंधारात संपुर्ण हॉल असंख्य लालभडक डोळ्यांनी भरलेला होता... इंगळासारखे ते डोळे जणु आग ओकत होते.

दुसर्‍याच क्षणी  ... दोघांनीही पिशवीतली थोडीशी रक्षा फुंकली  आणी हॉल करुण किंकाळ्या विव्हळणं यांनी भरुन गेला. लालभडक डोळे केव्हाच विझले होते... आता हॉल मध्ये कुजकट घाण वास ठासून भरलेला होता.  महंतांनी शांत पणे या दोघांकडे पाहीलं आणि मागे वळुन त्या खोलीचा दरवाजा हळूच उघडला.

भानावर आलेल्या या दोघांनी आता सेलफोन्स तयार ठेवलेलेच होते त्यातुन पटापट आतले अनेक फोटो घेतले.  काय कॅप्चर झालं कुणास ठाउक पण ठरल्या प्रमाणे त्यांनी फोटो काढले, एक झालं मात्र... काही क्षण ती खोली फ्लॅश तसंच टॉर्च  च्या प्रकाशाने न्हाऊन  निघाली.  आजुबाजुला विव्हळण्याचे आवाज येत होतेच. टॉर्च च्या प्रकाशात यांनी ते रांजण आतुन पाहिलं खरंच दोन छोटी मडकी फुटलेली होती.  खरं होतं की भास माहीत नाही पण  त्या फुटक्या मडक्यांच्या  आजुबाजुला काहीतरी वळवळंतय असं वाटुन गेलं. निलेश ने ताबडतोप मोबाईल काढला, पण महंतानी नको काही गरज नाही अशी खुण केली.

फारसं दिसत काहीच नाही तरी महंत का घुटमळलेत हे दोघांना कळेना..ते काहीतरी शोधत असावेत किंवा अपेक्षीत काहीतरी व्हायची वाट तरी बघत असावेत. यांनी टॉर्च पुन्हा महंतांच्या दिशेने अंदाजानेच लावला ते ऎकत असावेत. आणी हो..... दुरवर पडघम वाजत होते.. आजची लय मात्र तिव्र होती. त्यात त्वेष राग सुड ठासुन भरल्या सारखं वाटत होतं.

महंतांनी आता टॉर्च खोलीभर फिरवायला सुरुवात केली आणि एका क्षणी ते समाधानाने हसले. रांजणाजवळच काहीतरी पडलेलं त्यांनी पाहीलं आणी आधी काहीतरी पुटपुटत ते उचललं.... पांढरा रुमाल...

हा रुमाल १००% अपुर्व चा आहे. महंत म्हणाले. ...पाहिलंत काय सापळे आहेत हे ते ? वातावरण हे रांजण... त्यातली मडकी... लांबवरुन येणारे नगार्‍याचे आवाज हे सगळं आहे काय ?  गडबडुन .. घाबरुन माघारी जातांना काहीतरी इथे सोडुन जावं यासाठीची व्यवस्था.. हा रुमाल नक्कीच अपुर्व चा आहे. ... केतकी आणि शुभांगीचं पण काही ना काही इथे राहीलंय म्हणून त्यांना त्रास होतोय.  पण अपुर्व पेक्षा कमी.. मे बी इथे फिरतांना, सावरतांना यांचे केस इथे पडले असले पाहीजेत. ते शोधणं अशक्य दिसतंय पण अपुर्व नक्कीच अचानक शुद्धीत येईल तिकडे...

चला आता विहीरीची खोली तपासायचीये.   महंत म्हणाले आणि यंत्रवत हे सुद्धा त्यांच्या मागे जाऊ लागले.  या गडबडीत आपलं इथे काही राहीलं तर नाही ना ? ही भिती त्यांच्या तोंडावर आता स्पष्ट दिसली असती... पण अंधारात ते लपत होतं हातापायाला कंप आलाय हे एकमेकांना सांगायचे सुद्धा त्राण या क्षणी निलेश आणि राजेश यांच्यात आता नव्हते.


टॉर्च तयार.. मोबाईल्स पण तयार... घाणेरड्या वासातुन हे चालत चालत त्या विहीर असलेल्या खोलीसमोर आले.  महंतांनी मोबाईल काढला, एक मेसेज लिहिला या दोघांनी वाचला, पिशवीतील रक्षा दोघांहीनी कपाळावर लावली, थोडी अंगावर टाकली ( डोक्यासह ) आणि भयभीत अवस्थेत महंतांनी दार उघडायची वाट बघत बसले.

दरवाजा उघडताच कुबट वास, आणी गार वारा आलाच. टॉर्च च्या प्रकाशात मग खोलीची तपासणी सुरु झाली. सगळं यांनी पाहीलेलं पण... आज थोडंसं अव्यवस्थीत झालं असावं असंच वाटत होतं. कुबट वासासोबत आज जरासा दुर्गंधही येतोय हे यांनी ओळखलं. महंत मात्र कोळ्यांची जाळी का पाहताहेत हे यांना समजेना..

पुन्हा एकदा महंतांनी मोबाईल काढला.............. लगेच हे तयार झाले. मेसेज वाचला आणि डोळे विस्फारुन पाहु लागले.  मेसेज मध्ये या दोघांनी  एक एक मुठ रक्षा दोन्ही हाताच्या ओंजळीने त्या सळल्यांच्या जाळीतुन विहीरीच्या पाण्यावर फुंकायचं होतं. न घाबरता, जमल्यास त्यांना डोळे मिटायला सुचवलं होतं.

आपल्या छातीचे ठोके खोलीबाहेरही ऎकु येत असावेत एवढे जोरात आहेत याची यांना खात्री होत होती.  न राहवुन त्यांनी टॉर्च च्या प्रकाशात महंतांकडे पाहीलं ते डोळे मिटुन काहीतरी मंत्र पुटपुटत होते. ऎकु काहीच येत नसलं तरी काहीतरी दिव्य कठीण उच्चाराचे मंत्र असावेत असं वाटलं यांना.
सावकाश चालत हे त्या खिडकी समोर आले, महंतांनी करा सुरुवात अशी खुण केली.  प्रचंड हिंम्मत करत या दोघांनी ती रक्षा ओंजळीतुन त्या पाण्यावर फुंकली आणी असह्य किंकाळ्यांनी विहीर भरुन गेली. डोळे गच्च मिटुनही डोळ्यांसमोर काहीतरी प्रखर प्रकाश असावा असं फीलिंग होतं.  अचानक दोघांच्या डोक्यावर हात येऊन विसावले... खरं तर दचकुन यांनी कींकाळ्या फोडायच्या पण त्या स्पर्षात जादु / आधार आणि सुरक्षा जाणवत होती.

समोरचा प्रकाश कमी होत संपल्यावर हिंम्मत करत यांनी डोळे उघडले. ते त्याच गजांच्या खीडकीसमोर होते.. फक्त बाहेरील दृष्य त्यांच्या कल्पने पलीकडचं होतं..

विहीर खचाखच सडक्या / गळलेल्या / कुजलेल्या प्रेतांनी भरलेली होती.  त्या डेड बॉडीज सुद्धा वळवळत होत्या, कण्हत होत्या.. एवढा घाण वास आपण नाकातुन आत घेऊच कसं शकतोय हे यांना कळत नव्हतं.

एवढ्यात महंतांचा धीरगंभीर आवाज आला... जागे व्हा... इथली बरीचशी शक्ती नष्ट झाली आहे. विहीरीतलं विव्हळणं थांबलं की आपण पुढचा प्रयोग करणार आहोत.


दहाबारा मिनिटात विव्हळणं आक्रोश कमी होत होत बंद पडला. महंतांनी तिन्ही टॉर्चेस चा प्रकाश त्या विहीरीवर टाकल्यावर या दोघांची बोबडी वळली. विहीरीत आणि त्या भागात असंख्य धुसर काळपट आकृत्या तरंगत होत्या. मोजता येणार नाहीत एवढ्या... पाच सहा मधांची पोळी एकदम एका विहीरीत उठवली तर जशा मधमाश्या घोंगावतील तश्याच या आकृत्या घोंगावत होत्या... काळजाचं पाणी पाणी करणारं दृष्य.

घाबरु नका... हे सगळे या ट्रॅप चे बळी आहेत. निट पहा यात अगदी लहान लहान आकृत्याही आहेत. म्हणजे अगदी लहान मुलं तान्ही मुलं वगैरे सुद्धा इथे बळी गेलेत. किती वर्षांपासून हे इथे यातनांमध्ये होते माहीत नाही पण निदान इथेच खितपत पडायच्या बंधनातुन आपण त्यांना मुक्त केलेलं आहे. हे आम्हाला मुळीच इजा करणार नाहीयेत.  वास्तवीक सुक्ष्मात्याला नात्यांचे बंध नसतात, आपल्या यातनांना ते तुमच्या आमच्या सारख्या मानवांना जबाबदारही धरतात पण मी त्यांना जागवुन आम्ही इथे त्यांच्या सुटकेसाठी आलोत हे कळवलेलं आहे.

जे इथे रेंगाळले ते विहीरीकडे आकृष्ट होत इथेच खेचले गेले, आणि या यातनात शेकडो हजारो वर्षं खितपत पडलेत. यांच्यावर हुकुमत करणारे लक्ष ठेवणारे त्या खोल्यात आणि हॉल मध्ये गुलाम आत्मे इजा करायला तसंच प्रसंगी घाबरवायला अशी व्यवस्था असावी. या खोली बाहेर आता अशाच आकृत्या असणार आहेत ज्या माझ्याही नकळत तुम्ही मुक्त केल्यात. लाल डोळे दिसताच रक्षेचा वापर करत. चला हॉल मध्ये जाऊ.... घाबरु नका.. हॉल मध्ये या आकृत्या तुमच्या जवळ तुम्हाला बिलगुनही असतील. संख्या माहित नाही पण असंख्य असणार हे नक्की.  यांच्या हलचाली फक्त या यातनातळातुन सुटकेसाठी असणार आहेत आम्हाला इजा करायला नव्हे.  आज सुद्धा हे गुलामच आहेत आपण असेच निघुन  निघुन गेलो तर यांच्यावर हे प्रयोग करणारे यांना पुन्हा अडकवतील यात शंका नको. आणि म्हणूनच मी असं अर्धवट काम करत नाही.. श्रीगुरुंची आज्ञाच आहे तशी. नाश विनाश नव्हे ... संपुर्ण सुटका.. आपण तिच करणार आहोत.


हॉल मध्ये वातावरण आणखीच भयानक होतं.. तिथे मोजता येणार नाही एवढ्या आकृत्या होत्या.. सर्वत्र संचार करणार्‍या... एकमेकांना ढकलनार्‍या लोटणार्‍या आणी अनेक जण आपापसात चक्क हाणामार्‍या करतांनाही दिसत होते. या दोघांचे पाय लट लट कापत होते.. आहो सामान्य माणसाच्या नजरेची दृष्यं नव्हतीच ती.  एवढी भयानक स्वप्नं सुद्धा कधी पडली नव्हती या दोघांना.

या तिघांची चाहुल लागताच तिथे झालेला हलकल्लोळ शब्दात सांगता येणार नव्हता.  या दोघांची पाचावर धारण बसली होती. कुणी जोरात ओरड म्हटलं असतं तरी थोबाडातुन शब्द फुटला नसता.  आपण हे सगळं पाहुन शुद्धीत कसे हेच यांना समजत नव्हतं.  समोर आनंदाने... रागाने .. उत्साहाने त्वेषाने धावणार्‍या खेळणार्‍या नाचनार्‍या उडया मारणार्‍या त्या अगणीत भुतांना पाहुन आपण काही इथुन बाहेर पडत नाही असंच वाटुन गेलं यांना.

संपण्या आधी एकदा महंतांकडे पाहुन घ्यावं म्हणुन यांनी तिकडे पाहीलं ते प्रचंड उत्साहात आणि खुश दिसत होते. त्यांनी काहीतरी पुटपुटत दोन्ही हात वर केले आणी समोर चा गोंधळ एकदम शांत झाला....  पण संपुर्ण नव्हे. कुठे कुठे  घृणास्पद.. संतापाचे विखाराचे स्पष्ट उच्वार येत होतेच.

या दोघांना उद्देशुन महंत म्हणाले...  ऎका यात काही ते पण आहेत. रक्षेच्या आणि मंत्रांच्या प्रभावामुळे ते आपल्याला इजा करु शकत नाहीयेत. जे शांत झालेत तेच आपले सैनिक. यांची संख्या वाढेल ... विहिरीतील आकृत्या आता त्या लोखंडी जाळीतुन ती खोली नष्ट करत इथे येतील आणि मग सुरु होईल प्रलयंकारी तांडव. तेव्हा इथे शेकडो वर्षांच्या छळाचा बदला घ्यायची आग असेल. त्यांच्या मागे आपल्या रक्षेचा अंश आणि मंत्रांची शक्ती असेल.  त्यांच्यावर हुकुमत करणारे कमी नव्हेत तेही शक्तीशाली आहेतच...पण श्री गुरुंची सिध्धी, मंत्रशक्ती तसंच ती पवित्र रक्षा यांच्या कृपेने हे लक्षावधी आत्मे यांना संपवतील.  खुप मोठा संघर्ष होईल. महाप्रचंड उर्जा बाहेर पडेल ती अग्नीचं रुप घेईल आणी इथलं सगळं नष्ट होईल.  मी यांना आवाहन करणार आहे... मंत्र म्हणणार आहे.. आधी आपण बाहेर पडायच्या दरवाज्याजवळ जाणार आहोत. तो उघडताच तुम्ही शक्य तेवढ्या लवकर इथुन पळत मागे वळुन न पाहता गाडीत जायचंय. माझी काळजी नका करु.. मी येईनच पण पुर्ण आव्हान करुनच.  श्रीगुरु तुमचं आणी माझं रक्षण करायल समर्थ आहेत.


महंतांनी कितीही सहजतेनं सांगीतलं असलं तरी ठासुन भुतं / आत्मे / आकृत्या भरलेल्या त्या हॉल मधुन त्यांच्यातुनच मुख्य दरवाज्यापर्यंत जायचं हे या दोघांना महाभयंकर काम वाटत होतं.  माहीती नव्हतं तेव्हा खुषाल यांच्यातुनच आपण इथे फिरलो हे आठवुन ते शहारले.  काही केल्या त्यांचे पाय जागेवरुन उठेनात.

महंतांनी ते ओळखलं.. आणी दोघांचेही हात धरुन त्यांना जवळपास ओढत ते त्या आकृत्यांच्या गर्दित घुसले सुद्धा. अशा आकृत्या वासाला कुबट आणि कमालीच्या ओलसर तसंच थंड असतात हे या दोघांनी अनुभवलं.  काळजाचं पाणी पाणी होत होतं. त्यांच्यातुन जातांना त्यांना खर्जात गुरगुर पण ऎकायला आलीच.. ते म्हणजे “ ते “समजल्यावर फक्त जीव जायचा बाकी राहीला. पण अशा असंख्य ओल्या गिळगीळीत कुबट स्पर्शांनंतर एकदाचा तो दरवाजा आला. महंतांनी हात धरला नसता तर भीतीनेच आपण संपलो असतो हे त्यांनी मनोमन मान्य करुन टाकलं.

महंतांनी दरवाजा उघडला, यांना खुण करत यांच्यावर विभूती शिंपडली... जिवाच्या आकांताने मग हे दोघं एकमेकांचा हात धरुन पळाले.. एकमेकांना ओढत वगैरे ते कसे बसे मुख्य भिंतीच्या दरवाज्यापाशी पोहोचले आणि क्षणभर मागे वळुन पहायचे नाही हे महंतांनी सांगीतलेले विसरुन मागे पाहिलं गेलं..

दृष्य भयानक होतं अनेक मोठ्या काळ्या आकृत्या त्यांच्याच दिशेने झपाट्याने येत होत्या.. भयंकर भीतीने यांचे पाय निघेनात तेवढ्यात “ पळा.............. दरवाज्याबाहेर जा” अशी स्पष्ट हाक ऎकुन भानावर येत यांनी पळत ठेचाळत कशी बशी गाडी गाठली आणि आत शिरले. काचेतुन पाहतांना लक्षात आलं की त्या काळ्यांनीही दरवाजा ओलांडला होता आणि ते गाडिकडेच येत होते. आता तर सोबत महंतही नव्हते. आपण संपलो असं वाटत असतांनाच गाडीभोवती असलेल्या कुंकवाच्या वर्तुळाने पेट घेतला आणि भयाण किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला.


२९
बाहेर किंकाळ्या ऎकु येताच हे दोघं गाडीत पोहोचल्याचं महंतांना कळलं आता प्रोसिजर खुप खुप सोपी झाली होती.  शांतपणे मग त्यांनी विभुती फुंकली कुठेही कसलेही आवाज झाले नाहीत. एक अभिमंत्रीत जल सुद्धा त्यांनी हवेत शिंपडलं... डोळे मिटुन मग त्यांनी त्या अभागी आत्म्यांना काही आवाहनं केलीत.

शांतपणे चालत महंत मग दरवाजे ओलांडत बाहेर पडले मुख्य दरवाजातुनच गाडी ज्वाळांनी अजुनही वेढलेली पाहुन संघर्ष चालुच असल्याची त्यांना जाणीव झाली. कपाळावर रक्षा लावत डोळ्यांना तिर्थ लावत आणि हातात अभिमंत्रीत पवित्र पाणी घेऊन मग महंत बिनधास्तपणे ते पेटलेलं वर्तुळ ओलांडून गाडीकडे गेले.

गाडीत भयभीत दोघेजण थक्क होऊन बाहेरचा सिन बघत होते. महंतांनी हात वर केले, उच्च रवाने काहीतरी दिव्य मंत्र म्हणत त्यांनी अपुर्व ने आणलेल्या त्या झाडपाल्याला पेटत्या वर्तुळात टाकलं. काही क्षणातच वर्तुळ विझलं आश्चर्य म्हणजे एवढा वेळ पेटुन सुद्धा कुंकवाचं ते वर्तुळ आहे तसंच होतं.

महंतांनी या दोघांना बाहेर बोलावलं .. ओढलंच जवळपास.. आणी समोर पहा म्हणाले. कुंकवाचं वर्तुळ मध्येच पेटत होतं आणी पुन्हा विझत होतं. वीस पंचवीस मिनिटं हे होत राहीलं..

बाहेर आलेले एक तर या दिव्य वर्तुळामुळे संपलेत किंवा माघारी जात आहेत. आता यांची शक्ती अगदी क्षीण आहे. आणि आत असलेले आपले सैनिक संख्येने आणि शक्तीनेही यांच्या पेक्षा सरस आहेत. हे आपल्या जागी पाय ठेवताच तिथे जिवघेणा संघर्ष होईल प्रचंड शक्ती बाहेर पडेल आणि या वाड्याचा मागमुसही राहणार नाही. वास्तवीक गेलेल्यांना मंत्राग्नी देतात मी आधीच मंत्र देउन आलोय .. यांच्या संघर्षात अग्नी आपोआपच उत्पन्न होऊन शेकडो वर्षांच्या यातनांचा अंत होईल.

तसंच होऊ लागलं हे दोघं अनिमिष नेत्रांनी बघत होते. दगडी वाड्याच्या परिसरातुन आधी काळा धुर आणी मग अग्नितांडव झालं. एकाएकी प्रचंड तेजस्वी प्रकाशाचा लोळ आकाशात जातांना पाहुन महंत समाधानाने हसले. ती जागा ती वास्तु मुक्त झालेली होती. अगणीत लोकांच्या / त्यांच्या आत्म्यांच्या सुटकेचा तो क्षण... महंत तोंडाने काहीतरी म्हणत होतेच. संघर्षामुळेच निर्माण झालेली ती आग... संघर्ष संपला, वाईट शक्त्यांचा बिमोड झाला, वर जाणार्‍या अग्नीत तेही या भयानक योनीतुन पुढे सरकले. तशी ती आगच बटण बंद केल्यागत विझली. चला ... निघुया आता. महंत म्हणाले आणि हे त्या दिव्य दृष्यातुन बाहेर पडले. तुमच्या डोक्यात असंख्य प्रश्न आहेत माहीत आहे मला. पण त्याची उत्तर देण्याची ही वेळ नव्हे. ते सावकाश सांगेन आता आधी इथुन निघुया. गाडी स्टार्ट झाली आणी मुंबई च्या दिशेने धावु लागली.


महंत जरा फ्रेश होऊन हॉस्पीटल  ला पोहोचले तेव्हा तमाम टीम हजर होती. राजेश, निलेश, जुई, शुभांगी... शुभांगी  ला विलक्षण रित्या एकदम फ्रेश वाटत होतं, अपुर्व चक्क शुद्धीवर आलेला, सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. अपुर्व ला खुप काही बोलायचं होतं पण डॉक्टर परवानगी देत नव्हते. त्यांनी सगळ्या गर्दीला चक्क त्याला भेटायची मनाई केलेली होती.

“ आमच्या सततच्या काळजी आणी उत्तम औषधोपचाराचा हा विजय आहे” टाईप वाक्यं डॉक्टर मि. रणदिवेंना सुनावत होते. राजेश निलेश कडुन हे अपडेट ऎकुन महंत अर्थपुर्ण हसले. या दोघांना मात्र कधी एकदा ते थरारक अनुभव इतरांना सांगतो असं झालेलं... पण... परतीच्या प्रवासात महंतांनीच  यांना सांगुन ठेवलं होतं की योग्य वेळी मी हे सगळ्यांना सांगेन तोवर तुम्ही गप्प रहा.

महंतांना पाहुन आज मात्र डॉक्टरांना खुप जास्त आनंद झालेला दिसला नाही. पण महंतांना ते चांगलंच ओळखत असल्या मूळे त्यांनी महंतांना प्रोफेशनल स्माईल दिलं.  महंतही हसले. डॉक्टरांनी अपुर्व च्या डेव्हलपमेंट्स महंताना उत्साहात सांगीतल्या, महंतांनी डॉक्टरांना मोठ्या मनानं धन्यवाद दिले..

“ डॉक्टर ती तपासणीला घेतलेली पानं पाहीलीत का ? काही कळलं कसल्या वनस्पती आहेत ते  मला जरा उत्सुकता आहे त्याची. “

“ओ हो... तुम्हाला आठवतायत ती पानं ? मी तर फ्रीज मध्ये ठेवुन विसरलो होतो” 
“ ह्म्म बरं झालं विसरलात... आम्ही ती झाडं पाहुन आलोय... आता जरा फ्रीज मध्ये पहाल तर चमत्कार दिसेल... “ निदान तुम्हाला अत्यंत अनपेक्षीत काहीतरी पहायला मिळेल.... “  महंत म्हणाले आणि डॉक्टर चमकले..

“ चला पाहुन येऊ ... तुम्ही म्हणताच आहात तर... “ डॉक्टर उठले, महंतही त्यांच्या सोबत गेले.... फ्रीज चा दरवाजा उघडला, ज्या पॉलीथीन पाउच मध्ये ती पानं ठेवली ती उघडताच डॉक्टर चमकले.

“ काय झालं डॉक्टर ... ?  असं म्हणत महंत त्यांच्या जवळ गेले...

पाऊच मध्ये फक्त वळवळ्णारे आजवर कधीही न पाहिलेले चिकट हिरवे कीडे होते.. पाउच उघडताच आलेला दुर्गंध असह्य श्रेणीतला होता. धक्का बसल्यागत डॉक्टर शहारले, तो पाऊच त्यांच्या हातुन अभावितपणे खाली पडला.... पण महंत सावध होते..त्यांनी लगेच तो पाउच उचलुन पुन्हा सेल्फ झिप ने बंद केला.

“ तुम्हाला हरकत नसेल तर डॉक्टर ही पिशवी मी घेऊन जाणार आहे... असंही हा प्रांत तुमचा नक्कीच नाही..............इति महंत..
“ आहो लगेच घेउन जा.... तुम्ही नसतांना मी पाहीला असता तर इथुनच कचर्‍यात फेकला असता. “
“ मला कल्पना आहे डॉक्टर म्हणूनच मी इथवर लोचटासारखा आलो निव्वळ ही वस्तू हस्तगत करायला.... अपुर्व कंप्लीटली आउट ऑफ डेंजर आहे हे मी त्याला न पाहताच सांगु शकतो... फक्त मला हे ताब्यात घ्यायचं होतं.. “

“ तुम्ही मला विश्वासात घेऊन सांगायला हवं महंत... या पेशंट वर आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतलीये हे तुम्ही नाकारु शकत नाही. “

“अर्थातच.. मी ते कधीच नाकारणार नाही.  तुम्हाला मी सविस्तर सांगेन डॉक्टर पण आत्ता नाही... अजुन ही साखळी संपलेली नाही. मला थोडं काम अजुन करावं लागणार आहे.. त्यानंतर आपण भेटु मी तुम्हाला काहीही न लपवता सांगेन.

“ ओके.. डन... “

महंत मग तिथुन निघाले... ही मंडळी आपल्याला फॉलो करेल हे माहीत होतंच. आणि झालंही तसंच.


महंतांच्या मागोमाग चारी पोरं का निघुन गेली हे मि. रणदिवेंना समजेना... पण ओके.. अपुर्व मध्ये लक्षणीय डेव्हलपमेंट्स झाल्याचं समजल्यावर ते खुषीत होते, इतर रिलेटिव्हस ना कळवणे, अपडेट देणे याची त्यांना घाई झालेली.. काही चुकही नव्हतं त्यात..पण ते तरीही थांबले होते.. एकदा त्यांना लाडका लेक पहायचा होता आणि डॉक्टर मात्र एवढ्यात नाही यावर हट्टुन बसलेले.

इकडे हॉस्पीटल च्या आवाराबाहेर पोरांनी महंतांना गाठलंच. दोघांबरोवर दोन कार्ट्या पाहुन याच त्या हे महंतांच्या चाणाक्ष नजरेने ओळखले.  महंतांचं एक छान वाटलं या गृप ला.. त्यांना फार काही सांगावं लागत नाही हे आता या दोघांना तर पाठ झालेलं.  कुठेतरी ते आत्ता भेटायला नाही म्हणतील ही भिती वाट होती पण तसं काही झालं नाही.

पाचही जणांचा फौजफाटा महंतांच्या घरी पोहोचला. सगळ्यात आधी महंत आत जाऊन आले. आज काही उदबत्या लागणार नाहीत असं वाटलं होतं पण कसला तरी वास येऊ लागलाच. यांच्या हुंगण्याच्या एक्स्प्रेशन्स मुळे महंतही हसले..

“ अरे आज साध्याच आहेत. श्री गुरुंच्या प्रतिमेसमोर लावल्यात... “ अगदी नॉर्मली बोलुन महंतांनी वातावरणामधला ताण कमी केला.  काही सेकंद कुणीच काही बोललं नव्हतं. मग महंतच सुरु झाले...  पोरं नाही म्हटलं तरी बिचकली आहेत हे ओळखलं होतं त्यांनी.

“ काय शुभांगी ? अचानक बरी झालीस ना ? इकडे त्यांचं लक्ष दोन्ही मुलींकडे होतं.. जी उत्तर देईल ती शुभांगी एवढं सोपं कॅलक्युलेशन होतं ते.

“ हो आज साधारण दुपारी तिन च्या सुमारास मी ग्लानीतुन उठ्ले.. ती जणु एखाद्या प्रदिर्घ  झोपेतुनच.. “

“ माहीतीये मला.... एक फोन येईल पहा... कोल्हापुर हुन... केतकी ठणठणीत असल्या बद्दल.. हे बोलत असतांनाच. शुभांगी चा फोन खणखणला.... सगळे हसले.  तोच फोन.. केतकीला अचानक बरं वाटलं होतं. दोनेक दिवसांत ती परत येत होती.

“ चला सगळे बरे झालेत... आता प्रश्नोत्तरांचा तास घेऊन टाकु...  प्रथम मी सगळे प्रश्न सांगतो.. त्यापेक्षा वेगळं काही असेल तर तुम्ही विचारा.... एक एक नंबर देत मी प्रश्न सांगतो  मग उत्तरांकडे जाउयात  ओके ?

१) हा नक्की काय प्रकार होता.
२) उपाय झाला नसता तर काय झालं असतं ?
३) अपुर्व अचानक बरा कसा होतोय ?
४) शुभांगी / केतकी चमत्कार झाल्या सारख्या ठीक कशा झाल्या ?
५) अपुर्व काहीतरी घेऊन जागा झाला होता ते काय ?
सगळ्यांनी एकाच वेळी होकारार्थी माना डोलावल्या आणि महंत मग सांगु लागले.
पोरांनो आधी चहा टाकु या... मग सुरु करु ...... असं म्हणत ते आत गेले सुद्धा !! पोरं खरच चकीत होत होती... या माणसाला केव्हा काय हवं हे कसं समजतं याचं आता त्यांना अप्रुप वाटत होतं.  निव्वळ नशीब म्हणून असला सिद्ध पुरुष आपल्या मदतीला येऊ शकला याबाबत निलेश आणि राजेश तर देवाचे आभार मानत होते. कारणही तसंच होतं... काही तासांपुर्वीच त्यांनी जे अनुभवलं होतं ते अनुभव निव्वळ कल्पने पलिकडचे होते. दोघी मात्र प्रचंड उत्सुकतेत महंतांच्या कथनाची वाट बघत होत्या.  महंतानी काढलेले पाच प्रश्न सगळ्या प्रकरणाचं सार होते आणि या व्यतीरीक्त कसल्याही शंका यांच्या डोक्यात नव्हत्या.

चहा आला.... महंतांकडचा चहाही स्पेशलच असावा असं आता या दोघांना वाटायला लागलं होतं. इथे सगळ्या गोष्टी वेल कॅलक्युलेटेड आणी सहेतुक असाव्यात असंही वाटुन गेलं.

नाही रे बाळांनो.. तसं नाही... असं म्हणून महंतांनी काही विकेट्स आणखी घेतल्या.

“चला सुरुवात करायची ? “ पहिला प्रश्न .. हाच सगळ्यात महत्वाचा आहे. हे काय होतं ? सगळे सावरुन बसले आणि महंतांनी सांगायला सुरुवात केली.

ही एक जहरी करणी होती... अति प्राचिन असावी. संबंध खुप जुना असावा अगदी लोक जंगलवासी होते तेव्हापासून.  अधुन मधुन ऎकु येणारे नगारे / पडघम हे यामुळे. त्या काळी संदेशवहनासाठी नगार्‍यांवर विशिष्ठ बोल काढुन मेसेजेस दिले यायचे यावरुन या प्रकाराची प्राचिनता लक्षात यावी.

टोळ्या टोळ्यांतील युद्ध.. एकमेकांवर विजय मिळवायची जिद्द अनावर होऊन शेवटी अघोरी प्रकारांनी विजय मिळवणे यातुन या योजनेला सुरुवात झाली असावी. पुर्विचे सापळे कसे असावेत हे फार क्लीयर झालं नाही पण बदलत्या काळानुसार सापळे बदलत गेले आणि लोक फसत गेले.  यात मोटीव्ह हे विजयाचंच पुर्वी तरी असावं ..पण  काही काळापुर्वी कदाचित काही अघोरींच्या हे लक्षात तरी आलं असावं किंवा ते या सापळ्यात फसले तरी असावेत. फसलेले अघोरी इतर सामान्यांपेक्षा मरुन सुद्धा शक्ती राखुन असावेत आणी कालांतराने अशा भयानक आत्म्यांनीच मुळ योजनेचं नेतृत्व बळकावलं असायचीच शक्यता जास्त वाटते.

जसा काळ बदलत गेला तसा सापळ्यात बदल होऊन तुम्ही आम्ही पाहीलेला लेटेस्ट सापळा केव्हा तरी इंस्टॉल झाला असावा. आवारा बाहेर जे कार्यरत होते त्यांचं उर्जाक्षेत्र नक्कीच मुळ वाड्यात कुठे तरी दडलेलं असणार यात मला तरी शंका नाही.  रस्त्यावरुन लोकांना नुसतेच ट्रॅप केले जात नसुन हवं तिकडेच नेलं जातं हे आपण अनुभवलंच. अत्यंत सहजगत्या लोक त्या सापळ्यात अडकुन अघोरींच्या तावडीत जातात हे आपण पाहिलं. यासाठी हे मास हिप्नॉटीझम चा वापर करत होते अशी मला शंका आहे कारण एक दृश्य .. ज्यात नव्या कोर्‍या आलिशान गाडीत काही तरुण तरुणी तिथे जाउन आल्याचं सांगातात तो सिन जणु वेल क्राफ्टेड होतो... अगदी एखादी व्हिडीओ क्लिप पुन्हा पुन्हा लावावी एवढ्या सहजतेनं तो वटवला जातो.  याचाच अर्थ रस्त्याच्या आजुबाजुला त्यांचे हस्तक असतात.  जेव्हा ते नसतात तेव्हा सापळा बंद असतो काम करत नाही.


३३

आता हे सापळे का पण ? या बाबत मला खात्री आहे की लोकांना तिथपर्यंत नेऊन त्यांनाही त्या लोकांमध्ये सामील करणे.. आणि सैन्य वाढवणे शक्ती वाढवणे हा त्यामागे हेतु दिसतो. मोटीव्ह आणि एम.. आय मिन गोल काय तर कदाचित या दैवी जगावर अघोरी शक्तींचं राज्य आणणे.. अतिशयोक्ती वाटेल पण ही योजना सतत या योनी कडुन राबवली गेली आहे. तशीच ही सुद्धा. लोकांना या ट्रॅप मध्ये अडकवणं आणि आपला शक्तीसंचय करणं हा मुळ मोटिव्ह आहे.

जे स्पॉट ला चुकत गेले ते तिथेच आधी विहीरीत आणि त्यांच्यात निवड होत बाहेर अशा ड्युटीज लागत गेल्या असाव्यात.  करणी जहरी आहे. घातक तर आहेच आहे. रांजण उघडल्यावर वाजणारे पडघम हे नक्कीच इतरांना बोलावण्या साठी वाजत होते. मला खात्री आहे कोमा सदृष्य अवस्थेत अपुर्व यांच्यातच फिरत होता.  ट्रॅप मध्ये फसूनही जे वाड्यात चुकले नाहीत ते नॉर्मलीही सेफ बाहेर पडले असावेत. ज्यांचे अंश तिथे राहीले त्यांचा मात्र पाठलाग झाला आणि  आपल्यात खेचण्याचे तीव्र प्रयत्न  झाले. अपुर्व चा रुमाल सापडला, तो  करणी क्षेत्रातुन निघाला आणी तो आणखीच सेफ झाला..पण त्याने दिलेला लढा आपल्यापेक्षाही अविस्मरणीय्र आणि धिराचा.,. माझ्याकडे सिद्धी होती.. तुमच्या मागे माझी शक्ती होती पण.. अपुर्व ? तो बिचारा एकटा लढत होता. त्याच्या धिराला खरंच सलाम !!!

शुभांगी आणि केतकी पण काहीतरी तिथे सोडुन आलेल्या... अगदी नकळत..कदाचित त्यांचे केस तिथे पडलेले असणही पुरेसं होतं.  अर्थात शेवटच्या त्या संग्रामात सगळंच जळुन खाक झाल्यामुळे त्याही त्वरीत बर्‍या झाल्या.. चमत्कारासारख्या. मी माझ्या गुरुंच्या आज्ञेप्रमाणे आणि पद्धतीप्रमाणे आधी त्यांच्यातच फुट पाडली, सिद्धी वापरत त्यांनाही मुक्तीच्या रस्त्याने पुढे पाठवलं. आम्ही कमीच लढलॊ तीव्र लढले ते काही शतकं.. तपं वर्षं तिथे खितपत पडलेले ते बिचारे आत्मे. योजनेचा नायनाट त्यांनीच केला. बाकी रांजण.. त्यातली मडकी हा सगळा दिखावा..गुढतेत तिथे आलेल्यांच्या चुका व्हाव्यात, ते फसावे यासाठीचे ते सिंपल ट्रॅपस. दुसरा प्रश्न सोपा आहे. अशी मदत मिळाली नसती तर ट्रॅप मध्ये अडकलेले तिकडे जमा झालेच असते. अधुनिक शास्त्रातले कोणतेही उपाय कुचकामाचेच ठरले असते.


३४

जसा वाडा ती अघोरी भारलेली जागा नष्ट झाली अपुर्व जागा झाला.... कारण करणीचा प्रभाव संपुष्टात आला होता.  कुठल्या तरी लढ्यात अपुर्व काहीतरी ओरबाडुन घेऊन आला असावा आपल्याला सुचवण्या साठी असं मलाही वाटलं पण... ते तसं नव्हती.. त्याच काळात आपण तिकडे पोहोचलो होतो. योजनेचा पुढचा भाग सुरु झाला.  याला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणू या हवं तर...

अपुर्व घेऊन आलेली पानं त्याने ओढली म्हणण्या पेक्षा त्याला ती ओढायला भाग पाडलं गेलं असेल.  २०१६ मध्ये आपले अंश सोडण्या साठी.  अंदाजा प्रमाणेच दुसर्‍या दिवशी अघोरी वाडा नष्ट झाल्यावर ती पानं घातक किडे बनलेली होती.  डॉक्टरांनी मी विचारण्या आधी पाहीली असती तर म्हटल्या प्रमाणेच बाहेर कचर्‍यात किंवा रस्त्यावर फेकली असती आणि या किड्यांनी पुर्वीचं कार्य वेगळ्या स्वरुपात सुरु केलं असतं.  मी त्यांना आता पवित्र बांधलेल्या जागेत ठेवुन आलोय. पाउच फाडुन जरी ते बाहेर आले तर आमच्या त्या दिव्य शक्तींमूळे लगेच भस्मसात होतील. जेवढे तिकडचे ते आत्मे भयानक नव्हते तेवढे हे किडी आहेत हे नक्की कारण हजारो वर्षांचा प्रवास करुन ते इकडे आलेत.. जिवंत .... हे भयानक आहे.  यांचा योग्य नायनाट मुळ मोहिमे एवढाच गरजेचा आहे.

शेवटचा माझा टप्पा असेल प्रत्यक्ष अपुर्व शी बोलणे.... तो निवांत दोनेक दिवसांनतर करीन.. चारी जण स्थब्ध होऊन ऎकत होते... कोणत्या भयानक संकटातुन आपण निभावलो हे आठवुन पुन्हा पुन्हा शहारत होते.


३५  शेवटचा भाग.

आणि हो.. मला खात्री आहे तुम्ही तुमचे कॅमेरे चेक केले नसावेत... दाखवा पाहु त्या भयंकर प्रसंगातलं काय काय आलंय कॅमेर्‍यात ?
त्यातलं काहीतरी आपण नुसतंच आणलं नाहीये तर खिशात बाळगतोय या कल्पनेनेच दोघांना कसं तरीच झालं.

गॅलरी उघडली गेली असंख्य लाल ठिपके याशिवाय कुठल्याच फोटोत काहीही नव्हतं.पण संपुर्ण फोटो हे फक्त लाल ठिपक्यांनीच भरलेले होते.

अंदाज होताच. पण मला वाटत होतं काही तरी धुसर का होईना दिसेल.. पण इथे तर डोळेच डोळे दिसत आहेत. केवढ्या संख्येने होते पहा... चौघांचीही ते फोटो पाह्तांना अवस्था पाहण्यासारखी झाली होती. नकोच ते अमंगल द्रुष्यं.... महंतांनीच मग ते फोटो त्यांना डिलीट करायला सांगीतले.

काही दिवस हे गंडे असेच राहु द्या दंडावर.. एक अतिरिक्त सुरक्षा म्हणुन.. बाकी काळजी करण्यासारखं काहीही नाही..


दुसर्‍या दिवशीच महंत हॉस्पीटल मध्ये अपुर्व ला भेटायला गेले. तिथे त्याच्याच डिस्चार्ज ची गडबड सुरु होती. बहुदा पोरांनी कालच रणदिवेंना सगळं सांगीतलं असावं... ते महंतांच्या पायाच पडायला धावले. महंतांनी त्यांना तसंच थांबवलं.

“नो नो.. माझी ती ड्युटीच होती असं समजा. हा वाईट शक्ती आणि पवित्र शक्ती यांच्यातला संघर्ष होता हो.. ही पोरं एक निमित्त झालं असं समजा. यांचा काहीच दोष नव्हता. सहज म्हणून भटकणारेच या सापळ्यात सापडत असावेत.... “

“ चला आपण अपुर्व ला भेटु.. ही इज लुकिंग फ्रेश.. जणु काही झालंच नाही.” रणदिवेंच्या चेहेर्‍यावरुन उत्साह आणि आनंद ओसंडुन वाहत होता.  रुम मध्ये प्रवेश करताच महंतांना जाणवलं की अपुर्व अगदी खडखडीत बरा झाला आहे... त्याचे  मस्त पैकी डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्याशी हास्यविनोद चालले होते.

रणदिवेंनी मग अपुर्व ला त्यांना माहीत असलेलं सगळं सांगितलं. अपुर्व ने पण त्याला आलेले अनुभव महंतांना सांगीतले.

“ महंत काका.. मला दिपक चं रहस्य नाही समजलं... मी या व्यक्तीला ओळखतही नाही. जस्ट एक फेसबुक फ्रेंड. त्याने कसं ओळखलं की केतकी / शुभांगी पासून  मला धोका आहे ?
“ हम्म्म्म मुद्धा बरोबर आहे. पण अरे तु निट ओळखत नसशील तो तुला चांगलं ओळखत असेल. पण घटना चांगली नाही. माझा अंदाज असा आहे की.. तो पण त्या ट्रॅप मध्ये तुमच्या सारखाच अडकला असावा, तुमच्या आधीच. अंदाज येऊन कुण्या कमी सिद्ध माणसाला घेऊन महाशय तिकड जाऊन आले असावेत.. आणि त्यांनी नंतर तुम्हाला तिकडे जातांना पाहीलं असेल.  तुम्हीही त्याच मार्गाने जाताय म्हटल्यावर स्वत: संपण्या आधी त्याने तुला एक मेसेज टाकला असावा.”

“ पॉसिबल आहे.  ... अपुर्व एवधंच म्हणू शकला...
“ पण दिपक या जगाने नसणार आता.. मी खात्रीने सांगतो. कारण पुन्हा तिकडे गेल्यावर त्याच सापळ्यातील कार मधला एकजण निलेश आणि राजेश ला पाहुन व्याकुळ / दु:खी झाल्याचं मला माहीत आहेत .... मला वाटतं तोच दिपक असावा.. असो.. तिथल्या सगळ्यांनाच आम्ही  मुक्त केलेले आहे... दिपक च्या नशीबात जे होतं ते झालं असं समजायचं.. तसा सुदैवीच बिचारा.. अगणीत लोक शतकानुशतकं अडकलेली हा दिपक काही दिवसातच पुढच्या प्रवासाला गेला .. विसर आता ते.. आणी या नंतर अननोन जागी जाणं बंद करा .. सगळेच. चला मी येतो..... तुम्ही सगळे काळजी घ्या.... “

“ फार उपकार झाले महंत तुमचे..... आभार कसे मानावे हेच कळत नाही....”
“ रणदिवे साहेब.. उपकार वगैरे काही नाही.. श्री गुरुंची आज्ञाच आहे ती तीचं पालन करतो मी.. शेवटी ही सिद्धी गुरुचीच आहे  मी माझं कर्तव्य केलं बास... “ पण एक सांगतो..हा गृप अफलातुन आहे. पोरं खुप छान आहेत. तसंच एका भयानक योजनेला सुरुंग लावायला कारणीभुत आहेत. श्रीगुरु यांच्यावर सदैव कृपादृष्टी ठेवतील याची खात्री बाळगा. ... येतो मी.. “ नंतर आलेल्या लोकांत केतकीही होती... एकदम  नॉर्मल..

“ कधीही काही गरज पडल्यास माझ्या कडे या घर माहीत आहेच... असं हसत म्हणतच महंत प्रसन्न चेहेर्‍याने बाहेर पडले...

( समाप्त )

कथा संपुर्णपणे काल्पनीक असुन हीचा जिवंत वा मृत व्यतीशी कसलाही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

संजय वैद्य..
जळगांव.                








No comments:

Post a Comment